तुमसर : तुमसर शहरात बाईकस्वार परप्रांतीय चोरट्यांनी टोळी सक्रिय झाली असून शहरातील बाहेरील परिसरात त्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. यासोबतच तुमसर बसस्थानक तथा रेल्वे स्थानक परिसरातही खिसेकापूची टोळी सक्रिय झाल्याची माहिती आहे.तुमसर शहरातील खापा टोळी परिसरातील दुर्गानगर, विनोबा नगर, तामसवाडी रोड, गोवर्धन नगर, शिवाजी नगरातील शहरातील शहराबाहेरील परिसरात या परप्रांतीय मोटारसायकल स्वार चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मध्यरात्रीनंतर या परिसरातील नागरिकांनी या मोटारसायकलस्वारांना संदिग्ध स्थितीत फिरतांनी पाहिले आहे. दिवाळीत अनेक नौकरी करणारे कर्मचारी गावी गेले आहेत ते आता परत येत आहेत. शहराबाहेर घरे विरळ (दूर - दूर) आहेत. परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीसांच्या ससेमिरा लागू नये म्हणून या शिक्षित नोकरपेशा नागरिकांनी पोलिसात तक्रार केली नाही. तुमसरात पोलिसांची रात्री ग्रस्त निश्चितच राहते, परंतु शहराचा विस्तार मोठा असून घरे दूर - दूर पर्यंत आहेत. पोलीस ठाण्यात पोलीसांची पदेसुध्दा रिक्त आहेत. (तालुका प्रतिनिधी)
परप्रांतीय दुचाकीस्वार चोरट्यांची टोळी सक्रिय
By admin | Updated: November 8, 2014 00:52 IST