शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पानखिडकी, दिवाणघाटाची पडझड

By admin | Updated: December 28, 2016 02:03 IST

प्राचीन व ऐतिहासिक वारसा तसेच शेकडो मंदिर असलेल्या पवनी नगरातील मंदिराकडे नागरिकांनी लक्ष वेधून डागडुजी करणे सुरू केले

पवनीत ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित : निधीची वाणवा कायम अशोक पारधी पवनी प्राचीन व ऐतिहासिक वारसा तसेच शेकडो मंदिर असलेल्या पवनी नगरातील मंदिराकडे नागरिकांनी लक्ष वेधून डागडुजी करणे सुरू केले असले तरी ऐतिहासिक वारसा असलेले पानखिडकी व दिवाणघाट दुर्लक्षित असल्याने त्याची पडझड होत आहे. दुर्लक्षित राहिल्यास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘नाव मोठे दर्शन खोटे’ या उक्तीला शोभेल अशी अवस्था या नगराची झालेली आहे. विदर्भाची काशी असा उल्लेख प्रत्येकजण करतो, परंतू ज्यामुळे काशीची उपाधी लावण्यात येते. ते स्थळ मात्र दुर्लक्षित आहेत. पुरातत्व विभाग असो की स्थानिक प्रशासन असो सर्वांचेच याकडे दुर्लक्ष आहे. प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तर पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात लोंढे नगराकडे वळू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या प्राचीन जवाहरगेट, परकोट, हरदोलाची टेकडी, सुलेमान टेकडी, जगन्नाथ स्तुप यांचा समावेश आहे. पर्यटकांना दिसणाऱ्या स्थळापैकी जवाहरगेट, परकोट याकडे विभागाचे लक्ष आहे. त्याची डागडुजी केल्या जाते. जगन्नाथ स्तुपाचे उत्खनन बाहेर काढण्यात आलेल्या मौलिक बाबी संग्रहालयात पाठविण्यात आलेल्या आहेत. कित्येक खांब अद्याप जमिनीवर पडून आहेत. वैनगंगा नदीचे नगराकडील तिरावर दिवाण घाट पानखिडकी, ताराबाईचा घाट, वैजेश्वर घाट अशी घाट आहेत. यापैकी एकही घाट पुरातत्व विभागाकडून संरक्षित करण्यात आलेले नाही. संरक्षित नसल्याने घाटांच्या डागडूजीसाठी शासनाच्या कोणत्याच विभागाचा निधी त्यावर खर्च होत नाही. परिणामी घाटांची झपाट्याने पडझड होवू लागली आहे. वैजेश्वर घाटावर भाविकांची वर्षभर वर्दळ राहते. वैजेश्वर घाट दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला असला तरी ऐतिहासिक महत्व असलेला दिवाणघाट व पानखिडकी यावर आतापर्यंत एक रूपयासुध्दा खर्च करण्यात आलेला नाही. दिवाणघाट करण्यासाठी तर पानखिडकी पवनीबाहेर जाण्यासाठी खुष्कीचा मार्ग म्हणून प्रसिध्द होता. दोन्ही घाटांची दुरुस्ती केल्यास पर्यटक घाटापर्यंत जाऊन ऐतिहासिक वारसांच्या आठवणी घेऊन परततील व अन्य पर्यटकांना घाटांचे माहात्म्य कथन करुन पर्यटकांपर्यंत माहिती पोहेचेल. नगरात पर्यटकांची वर्दळ वाढली. तरच पवनीचा विकास शक्य आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने प्राधान्याने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करावा असे नगरवासीयांना वाटत आहे.