बाॅक्स
पीक वाचविण्यासाठी धडपड
जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली आहे. साधारणत: ४० हजार हेक्टरवर राेवणी झाली आहे. मात्र पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी पीक वाचविण्याची धडपड करीत आहे. एकादशीला पावसाचे आगमन झाल्याने आता दमदार पाऊस बरसावा, अशी पांडुरंग चरणी शेतकऱ्यांनी प्रार्थना केली आहे.
बाॅक्स
शेतशिवार पिकू दे, काेराेनाचे संकट टळू दे..
पालांदूर : काेराेनाचा संसर्ग आणि बेपत्ता झालेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवारी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांनी पांडुरंगाला आर्त हाक मारली. शेतशिवार पिकू दे काेराेनाचे संकट टळू दे, अशी विनवणी गावागावातील विठ्ठल मंदिरत करण्यात आली. पालांदूर परिसरातून शेकडाे भाविक पंढरीला जातात. परंतु यावर्षी काेराेनामुळे गावातील विठ्ठल मंदिरातच पूजापाठ करण्यात आली. भक्तांची आर्त हाक पांडुरंगापर्यंत पाेहाेचली. आणि मंगळवारी दुपारी पालांदूर परिसरात धाे धाे पाऊस बरसला.