शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पांडे महाल विक्रीचे षडयंत्र

By admin | Updated: May 16, 2017 00:20 IST

शहरातील पुरातण वास्तु असलेला पांडे महाल भंडारा शहरच नव्हे तर विदर्भात ख्यातीप्राप्त आहे.

धनाढ्यांची नजर : शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील पुरातण वास्तु असलेला पांडे महाल भंडारा शहरच नव्हे तर विदर्भात ख्यातीप्राप्त आहे. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी हा महाल विक्रीचा कट काही व्यवसायिकांनी रचला होता. त्यावेळी शिवसेनेसह सामाजिक संघटनांनी आंदोलने करून हा कट हाणून पाडला होता. परंतु आता हा महाल विकण्याचा प्रयत्न सुरू असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत विकला जावू नये, यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तत्कालीन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यावेळी प्रशासनाने या महालाचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करवून पांडे महाल पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानंतर पुरातण वास्तु घोषित केले होते. त्यानंतर आता ५ वर्षांनी हा महाल पुरातण वास्तु नाही, असा आदेश पुरातत्व विभागाकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे हा महाल खरेदी-विक्रीचा अडथळा मागील दाराने हटविण्यात आले. आता पांडे महाल खरेदी-विक्रीचे षडयंत्र थांबविण्याची मागणी होत आहे. महाल विक्री होणे तातडीने थांबवून सदर महालाचे जतन व्हावे, या महालाचा गौरव आणि नागरिकांच्या भावनांचा आदर कायम ठेवावा. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा उपसभापती ललित बोंदे्र मुकेश थोटे, सुरेश धुर्वे, रोशन कळंबे, यशवंत वंजारी, सुमित मेश्राम, प्रणय बंसोड, श्यामराव सेलोकर, यशवंत सोनकुसरे, अनिल गायधेन, संजय रेहपाडे, शुभम बारापात्रे, संदीप सार्वे यांनी दिला आहे.