शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बळजबरीने बनविला शेतातून पांदण रस्ता

By admin | Updated: June 7, 2017 00:29 IST

चिचखेडा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून बनविण्यात येत असलेला पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून बळजबरीने तयार करण्यात येत असून ...

चिचखेडा येथील प्रकार : अभियंता व रोजगार सेवकावर कारवाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : चिचखेडा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून बनविण्यात येत असलेला पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून बळजबरीने तयार करण्यात येत असून काही शेतकऱ्यांची परवानगी सुद्धा घेण्यात आली नाही. त्यामुळे रोहयो अभियंता निनावे व रोजगार सेवक नरेश बोंदरे यांच्यावर शासनाच्या पैशाचा अपव्यय केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी भैय्या सेलोकर व नाना सेलोकर यांनी केली आहे. दोन वर्षापूर्वी याच रस्त्याचे काम दाखवून पैसे लाटण्यात आले होते, हे विशेष.चिचखेडा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्याचे काम सुरु आहे. ज्या ठिकाणी आमरस्ता आहे, त्या रस्त्याला मातीकाम व मुरुमकाम करून पक्का रस्ता बनविण्यात येतो. मात्र खासगी रस्त्याला किंवा खासगी कामे सध्या रोहयो मधून केल्या जात नाही. तसेच त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची सहमती घेणे सुद्धा अनिवार्य असते. मात्र भैय्या सेलोकर ते मिताराम दमाहे यांच्या शेतापर्यंत तयार करण्यात येत असलेला रस्ता शेतकऱ्यांच्या जागेतून असल्याने तसेच काही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इतर शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता तयार करण्यात येत होता. यावर काही शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी आपली शेतजमीन देण्यास नकार दिली. तरी बळजबरीने या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. भैय्या सेलोकर व नाना सेलोकर यांनी या कामाला विरोध केला व रस्त्याचे काम बंद पाडले. त्यामुळे या दोघांची मोहाडी पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली. शेतकऱ्यांचे आक्षेप असताना यंत्रणेने हे काम रोहयोद्वारे करण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. काही विशिष्ट शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी इतर शेतकऱ्यांवर अन्याय करून व त्यांची शेतजमीन बळजबरीने हिसकावून त्यावर रस्ता तयार करण्यात येत आहे. भैय्या सेलोकर ते मिताराम दमाहे हा पांदन रस्ता काम त्वरीत बंद करण्यात यावे व रोहयो अभियंता निनावे व रोजगार सेवक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भैय्या सेलोकर व नाना सेलोकर यांनी केली आहे. याचे निवेदन त्यांनी मोहाडी तहसीलदार, खंडविकास अधिकारी यांना केली आहे. शासन या गंभीर प्रकरणावर काय भूमिका घेते व दोषींवर कारवाई करते का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.सदर रस्ता हा वादात असल्याने त्याचे काम करण्यासाठी मी संमती दिली नाही. खंडविकास अधिकारी यांनी स्वत: त्या रस्त्याला मंजुरी दिली. शेतकऱ्यांचे आक्षेप असताना सुद्धा. सध्या त्या रस्त्याचे काम बंद आहे.-परसराम गाढवे,सरपंच, चिचखेडा.