शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्ता कामावर बोगस मजुरांसह स्वयंपाकी महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:10 IST

रोजगार सेवक दोषी: दहा मजुरांचे बोगस नाव; खैरलांजी येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा): खैरलांजी येथील पाणंद रस्त्याच्या अकुशल कामावर बोगस मजुरांसह जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या स्वयंपाकी महिलेचे नाव रोजगार सेवकाने रोहयोच्या कामावर घातले. चौकशी अधिकाऱ्याच्या चौकशीत हा गैरप्रकार निष्पन्न झाला. रोजगार सेवकाने शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याचे चौकशीत आढळून आल्यानंतर चौकशी अहवालात रोजगार सेवकाला दोषी ठरविण्यात आले आहे. एप्रिलपासून गाजत असलेल्या प्रकरणात तब्बल ३ महिन्यांनंतर तक्रारकर्त्यांना न्याय मिळाला आहे. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

खैरलांजी गावातील निगम डायरे ते सूरज पारधी यांच्या घरापर्यंतच्या रोहयो अकुशल कामावर १२० मजूर कामावर होते. यात १० मजूर बोगस असल्याची माहिती मिळताच उपसरपंच नवनीत मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शिशुकला ठाकरे, प्रेमलता तिवाडे, वीणा मते, देवकन पारधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. रोजगार सेवक बोगस मजुरांची नावे नोंदवून शासकीय निधी लाटत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर उपसरपंच आणि सदस्यांसोबत रोजगार सेवकाने भांडण केले. शिवीगाळ केली. याप्रकरणी तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 

गावात बोगस मजुरांच्या नावावर रोजगार सेवकाने निधी लाटल्याचा प्रकार चर्चेत आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. १८ लाख ८ हजार ८७३ रुपये खर्चाच्या पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. बोगस मजूर प्रकरण तापत असताना खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. ८ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत कामाची चौकशी करण्यात आली. ग्रामपंचायतच्या सभागृहात १ जुलैला १० बोगस मजुरांना समितीने चौकशीसाठी पत्र दिले. परंतु, ९ बोगस मजूर चौकशी समितीच्या समोर गैरहजर होते. एक मजूर उपस्थित झाला. मजुराचे नाव ऐकून समिती सदस्यांच्या भुवया उंचावल्या. बोगस मजुरांच्या यादीत १० क्रमांकावर जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या स्वयंपाकी महिलेचे नाव होते. दुर्गा रवी मते या महिलेचे नाव आल्याने त्यांनाही धक्काच बसला.

रोजगार सेवक टेकचंद जीवन डाकरे यांच्याविरोधात समितीने दोषी असल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान, हे बोगस मजुरांचे प्रकरण 'लोकमत'ने लावून धरले. उपसरपंचासह ग्रामपंचायतच्या सदस्यांना तब्बल तीन महिन्यांचे नंतर न्याय मिळाला आहे.

पाठबळ दिल्यास आमरण उपोषणचौकशी अहवालात रोजगार सेवक दोषी आहे. परंतु, निलंबनाची कारवाई केली जात नसल्याने अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. पाठबळ देण्यासाठी पळवाट शोधली जात आहे. राजकीय दबाव वाढविला जात आहे. खैरलांजी बोगस मजूर प्रकरणात दोषी आढळून आलेल्या रोजगार सेवकाला पाठबळ दिल्यास आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंचांसह सदस्यांनी दिली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा