शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पालांदूर जि.प. व ग्रा.पं.ची पोटनिवडणूक शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:46 IST

पालांदूर जिल्हा परिषद व सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक रविवारला शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह व ढगाळ वातावरणात दिवसभर मतदान केंद्रावर तोबा गर्दी होती. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मोकळे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.

ठळक मुद्देमतमोजणी आज : मतदान क्रमांक व बुथ क्रमांक शोधताना अनेकांची धांदल, दिव्यांगांच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पालांदूर जिल्हा परिषद व सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक रविवारला शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह व ढगाळ वातावरणात दिवसभर मतदान केंद्रावर तोबा गर्दी होती. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मोकळे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. जिल्हा परिषद पालांदूर येथील चार बुथची सरासरी मतदान ६८.२० टक्के झाले, ग्रामपंचायतचे ७६ टक्के मतदान झाले.सकाळी ७.३० वाजतापासून मतदान केंद्रावर मतदारांनी उत्साही वातावरणात मतदानाला आरंभ केला. मात्र प्रभाग पाचच्या यादीतील एक पान नसल्याने थोडावेळ गोंधळ उडाला. प्रशासनाच्या लक्षात येताच चुकीने सुटलेले पान अगदी कमी वेळात लावून मतदारांना मतदानाकरिता उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच व दोन सदस्यांच्या निवडणुकीत प्रमाणपत्रानुसार मतदान याद्या सुरळीत होत्या. मात्र जिल्हा परिषदच्या मतदानाकरिता प्रभागानुसार मतदारांची यादी नसल्याने एका केंद्रावरून दुसºया केंद्रावर जाण्याची वेळ मतदारांवर आली. काही मतदारांना तर जिल्हा परिषदचा मतदान क्रमांकच मिळत नसल्याने निराशेपोटी उगीचच कटकट म्हणून मतदानाचे काम टाळले. हा प्रकार जिल्हा परिषद हायस्कुल येथे बुथ क्रमांक चार व पाचवर घडला. मतदान क्रमांक व बुथ क्रमांक शोधताना उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला.पालांदुरचे तलाठी बावनकर व मंडळ अधिकारी पंधरे यांनी यशस्विपणे मतदान केंद्रावर काम पाहिले. ठाणेदार अंबादास सुनगार यांनी आपल्या ताफ्यासह चोख बंदोबस्तात मतदान केंद्रावर सेवा पुरविली.जिल्हा परिषद क्षेत्रात २३ बुथवर अगदी शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. शक्यतो एकाच शाळेत जिल्हा परिषद व ग्रामपंचायतचे मतदान केंद्र ठेवले असते तर मतदारांना मतदानाकरिता अडचणी झाल्या नसत्या, असा सूर उमेदवारांनी व पुढाऱ्यांनी व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यागांना खुर्चीची सोय केली होती. ती सोय आज नसल्याने दिव्यांगांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला.मतमोजणी सोमवारला तहसील कार्यालय लाखनी येथे सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजतापर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे. पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. मतमोजणीत कुणाचे पारडे जड ठरणार आहे, याकडे आता लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक