शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पालांदूर वितरिकेचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

नेरला उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याचे काम मांगली, मचारना व जेवणाळाच्या शिवेपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. हे काम दोन वर्षांपासून जिथल्या ...

नेरला उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याचे काम मांगली, मचारना व जेवणाळाच्या शिवेपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. हे काम दोन वर्षांपासून जिथल्या तिथेच पेंडिंग आहे. काम पुढे सरकत नसल्याने स्थानिक नेत्यांनी चौकशी केली. यात ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी थेट महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दाद मागितली. संबंधित यंत्रणेला नाना पटोले यांनी कारणमीमांसा विचारत तत्काळ खंडित काम मार्गी लावण्याचे सुचविले. वास्तव परिस्थिती लक्षात घेता जिथपर्यंत कालवा आलेला आहे, तिथपर्यंत समस्या नाही. मात्र जेवणाळा सीमेत महसूल की वनखाते या वादात पालांदूर सिंचन वितरिका अडलेली आहे.

०.८४ हेक्टर आर जमीन न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याने पालांदूर वितरिका थंड बस्त्यात आहे. काल-परवा मांगली मचारना परिसरात नेरला लिफ्टचे पाणी आले. पऱ्ह्यांना जीवदान मिळाले. थांबलेली रोवणी पुन्हा सुरू झाली. पालांदूर अगदी ५ किलोमीटरवर असल्याने येथील शेतकरी मात्र कोरडाच ठरलेला आहे. जेवणाळा येथील ग्रामपंचायतने ठराव करीत भूमिगत बंधारा बांधण्याचा मार्ग मोकळा केला. माजी सभापती विनायक बुरडे यांनीसुद्धा या वितरिकेचे काम युद्धस्तरावर वेळेत व्हावे याकरिता प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क केला. त्यांच्याशी वास्तव परिस्थितीवर चर्चा करीत भूमिगत नहराचे (कालवा) महत्त्व पटवून दिले. मात्र, अजूनही काम पेंडिंग पडलेले आहे.