शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

धान सडले

By admin | Updated: June 24, 2015 00:59 IST

शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेने तालुकास्तरावर आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू केले.

लाखांदूर : शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव मिळावा म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेने तालुकास्तरावर आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू केले. खरेदी केलेल्या धान्याचे चुकारे पूर्णत: अडले असून मोजणीकरीता ठेवलेले हजारो क्विंटल धान पाण्यात सडले. यामुळे पीक कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकरी कोंडीत सापडला आहे.तालुक्यात धानाला हमीभाव प्रती क्विंटल १,३६० रूपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी दलालाकडून होणारी लुट थांबविण्यासाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडे धाव घेतली. तालुक्यात विजय लक्ष्मी सह. राईस मिल अंतर्गत लाखांदूर, पुयार, दिघोरी, बारव्हा येथे केंद्र सुरू केले. खरेदी विक्री सहकारी संस्थेअंतर्गत सरांडी, भागडी, हरदोली, दिघोरी येथे केंद्र सुरू करण्यात आले. पंचशील राईस मिल मासळ येथे सुद्धा धान्य खरेदी करण्यात आले. विजय लक्ष्मी सह करा राईस मिल केंद्रावर सध्यास्थितीत १२,११२ क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. एकूण १ कोटी ६४ लक्ष ७२ हजार ३२० रूपयांचे चुकारे मागील एक महिन्यापासून अडून आहेत. हीच परिस्थिती सर्व केंद्रावर दिसून येते. तालुक्यातील सर्व आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेट दिली असता विघटक परिस्थिती आढळून आली. एकीकडे धान्याचे चुकारे अडले असताना हजारो क्विंटल धान्य उघड्यावर पडून आहे. पावसाचे पाणी जमा झाल्याने हजारो क्विंटल धान्य पाण्यात भिजले.. धानाला कोंब निघाल्याने केंद्रावरील कर्मचारी धान्य मोजण्यास मनाई करीत आहेत. धान्य खरेदीची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या कालावधीत धान्य मोजणे शक्य नाही. परिणामी कर्मचारी शेतकऱ्यांना धान्य परत नेण्यासाठी दमदाटी करीत आहेत. सडलेले धान्य शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. धान्य खरेदीसाठी मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून अद्याप चुकारे मिळाले नसल्याने खरीप पिकासाठी शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत सापडणार आहे. (तालुका प्रतिनिधी)