शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:52 IST

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष ...

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धान पीकाची लागवड केली जाते. धानपीकासाठी जमीनाचा पोत उत्तम असल्यामुळे वर्षाकाठी खरीप व रब्बी हंगामात पीक शेतकरी घेत असतो. परंतु या धान पीकाची खरी मदार पावसावर असते. यावर्षी मृग नक्षत्रापासून पाऊस दमदार बरसला असला तरी हलके धान गर्भात असताना एका पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. दुसरीकडे धान पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी मोहाडी व भंडारा तालुक्यात चक्क आंदोलन छेडण्यात आले आहे.धान पिकत नसेल तर जगावे तरी कसे? असा संतप्त व तेवढाच मनाला उद्वीग्न करणारा प्रश्न बळीराजा विचारीत आहेत. जिल्ह्यातील मध्यम तथा अन्य लघु प्रकल्पामध्ये पाणी साठा असतांना सिंचनासाठी दिले जात नाही. दुसरीकडे पेंच प्रकल्प विभागासोबत करार करुनही टेलपर्यंत पाणी न पोहोचल्याने बळीराजा हताश झाला आहे.चौरास भागात काही ठिकाणी धान पिकाच्या मळणीला प्रांरभ झाला असला तरी काही ठिकाणी स्थिती हादरुन टाकणारी आहे. यात सर्वात जास्त टेंशन अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली व लाखनी परिसरात धान पीकासाठी एका पाण्याची गरज आहे. मात्र यास्थितीत पाणी मिळूनही त्याचा उपयोग राहणार नाही असेही शेतकरी बोलून दाखवित आहे. एकंदरीत यावर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.प्रशासन म्हणते सर्व आलबेलधानपीकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी विविध संघटना व लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलन उभारले आहे. पाणी जेव्हा येईल तेव्हापर्यंत धान पीक हातचे जाणार अशी भिती असताना जिल्हा प्रशासन मात्र आलबेल असल्याचे सांगत आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत आलेल्या पीक पेरणी अहवालात धानाचे उत्पादन चांगले येईल, असे दिसून येते.पाण्याअभावी धानपीक वाळत आहे, अशा आशयाची कुठलीही वार्ता किंवा माहिती आमच्या कार्यालयापर्यंत अधिकृतपणे आलेली नाही. हलके धान येत्या काही दिवसात निघणार आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल असे काही चिन्ह दिसून येत नाही.-हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी