शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबीचा विचार लक्षात घेता शासनातर्फे शेतकऱ्यांना सरसकट धानाला प्रति क्विंटल ३०० रूपये याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्याची मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी भात उत्पादक शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानपोटी प्रति हेक्टरी ६,८७० ते रूपये २३,२५० इतकी ...

ठळक मुद्देपरिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश : मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबीचा विचार लक्षात घेता शासनातर्फे शेतकऱ्यांना सरसकट धानाला प्रति क्विंटल ३०० रूपये याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्याची मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी भात उत्पादक शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानपोटी प्रति हेक्टरी ६,८७० ते रूपये २३,२५० इतकी मदत मिळणार असल्याची आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना ६० क्विंटलपर्यंत २०० रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा विधानपरिषद सभागृहात केली.यावर्षी भंडारा-गोंदिया तसेच धान उत्पादक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याने धान रोवणी केलेली नाही तर काही शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे रोवणी केली. त्यातच यावर्षी तुडतुडा रोगामुळे धानपिक संपूर्ण सरसकट नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे. त्यामुळे शेतकºयांना धान पिकाच्या रोवणी करीता बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे सुद्धा कठीण झाले आहे. या निर्णयामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे आ. फुके यांनी सांगितले.