शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

भंडारा  तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड  बेड  तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक  तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले.  यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरणी करताना आंतरपीक म्हणून कोथिंबीर पीक रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवडीचे मार्गदर्शन केले

ठळक मुद्देभंडारा तालुक्यातील माटोरा येथे बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामातील धानपिकाला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पीकांवरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. जिल्ह्यात आलेला महापूर तसेच तुडतुडा किडीचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी धान पिकाचे उत्पादन घटले आहे. यातून  शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कृषी कर्मचाऱ्यांमार्फत रबी पीकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच हरभरा पिकाच्या बीबीएफ पद्धत लागवडीचे धडे दिले जात आहेत. भंडारा  तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड  बेड  तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक  तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरणी करताना आंतरपीक म्हणून कोथिंबीर पीक रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवडीचे मार्गदर्शन केले.  माटोरा येथील शेतकरी खुशाल शेंडे, यादोवराव ढेंगे, किशोर  निंबार्ते, दिनेश भुते, डोनू सूर्यवंशी यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या पीकाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. तालुक्यातील  अनेक शेतकऱ्यांनी रुंद  सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकाची पेरणी केली  आहे. भंडारा तालुक्यात हरभरा लागवडीखालील क्षेत्र मोठे असून यासाठी भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी विजय हुमणे, होमराज धांडे, पर्यवेक्षक माया कांबळे, कृषी सहाय्यक गिरिधारी मलेवार  यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक  पद्धतीने पेरणीचे मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांची बोलताना सांगितले. अनेक शेतकरी हरभरा, गहू, लाखोरी पिकांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करीत आहेत. कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना बिजप्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिकातील मर रोगाचे प्रमाण कमी होत असून उत्पादनात अधिक भर पडत असल्याने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षित दाखविण्यात येत आहेत. शेतकरी रुंद सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकांची पेरणी करीत असल्याने उत्पादनात चांगली वाढ होणार असल्याचेभंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

हरभरा पिकासाठी रुंद सरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून अनेक शेतकरी बीबीएफ पद्धतीने पेरणी करीत आहेत. शेतकऱ्यांना आंतरपिकाचेही मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात रब्बीचे क्षेत्र मोठे असून कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करीत आहोत.- अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा

शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करुनच पिकांची पेरणी करावी. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळते. बीबीएफ पद्धतीचे मार्गदर्शन गटनिहाय पद्धतीने करणे सुरु आहे. उत्पादन वाढीसाठी ही पद्धत अतिशय फायदेशीर आहे. - गिरीधारी मलेवार,  कृषी सहाय्यक,माटोरा.