शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी भात व ऊस पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:54 IST

तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. पाण्याअभावी धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यात आठ तास वीज पुरवठा : तापमानात वाढ, निवडणूक संपताच दोन तास वाढले भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. पाण्याअभावी धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.तुमसर तालुक्यात यावर्षी उन्हाळी धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. विहिरीत पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु थ्री फेस वीज पुरवठा केवळ आठ तास करणे सुरु आहे. किमान बारा तास वीज पुरवठा करण्याची गरज आहे. आठवड्यात रात्री १२ नंतर तीन दिवस वीज पुरवठा करण्यात येतो. तर चार दिवस दिवसा वीज पुरवठा वीज वितरण कंपनी करीत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने केले होते.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा आठ तास वीज पुरवठा देणे सुरु केले आहे. भर उन्हात पाण्याअभावी धान पीक करपू लागले आहे. शेतकऱ्यांनी धान व नगदी ऊस पिकाची लागवड केली आहे. ऊसाचे पिकही येथे धोक्यात आले आहे. धानाला जादा भाव देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर तुमसर तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली हे विशेष. वीज पुरवठा तासात वाढ न केल्याने येथील शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांनी धान व ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पिकांना पाणी पुरेसा होत नाही. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. किमान १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा.-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, सिलेगाव.