शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुरकाबोडी, येटेवाही जंगलात वाघाच्या पाऊलखुणा

By admin | Updated: July 26, 2016 00:41 IST

भंडारा जिल्ह्यातील कऱ्हांडला राष्ट्रीय प्रकल्पातून १९ मे पासून जिल्ह्यातील सर्वच अभयारण्य पिंजूनही ‘जय’चा थांगपत्ता नाही.

जय तर नसावा ना : घटनास्थळावर जनावर मृतावस्थेतचिचाळ : भंडारा जिल्ह्यातील कऱ्हांडला राष्ट्रीय प्रकल्पातून १९ मे पासून जिल्ह्यातील सर्वच अभयारण्य पिंजूनही ‘जय’चा थांगपत्ता नाही. मात्र चिचाळ येथील माजी सरपंच मुनीश्वर काटेखाये हे लाखनी वरून चिचाळ येथे कुटुंबीयांसह येत असताना रात्रीच्या सुमारास पुरकाबोडी तिर्री मार्गावर चार फुट उंचीचा पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला त्यांना दिसला. काटेखाये यांनी कऱ्हांडला अभयारण्यात दिसलेला वाघ हा ‘जय’च असावा का? या दिशेने वनविभागाचा तपास सुरू आहे.चिचाळ येथील माजी सरपंच मुनीश्वर काटेखाये हे लाखनी वरून कुटुंबियांसोबत येत असताना पुरकाबोडी ओढ्याशेजारी पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला दिसला. २० जुलैच्या रात्री खापा जंगलातील मुख्य रस्त्यावर रात्री १.१५ त्यांना हरणाचा कळप दिसला. त्यामुळे या जंगलात वाघ असल्याची माहिती त्यांनी अड्याळचे वनक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक यांना दिली. काटेखाये व्याघ्र स्वरक्षण दलाचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.पी. चंद्रात्रे व यांच्यासोबत वन्यजीवप्रेमी शाहीद खान यांनी घटनास्थळाला भेट दिली.काटेखाये यांनी सांगितलेल्या ठिकाणी वाघाचे छावे व ज्या ठिकाणी हरिण व रानडुक्कर दिसले तिथे मृतावस्थेत डुक्कर व मृत गायीचे सापळे, वाघाने अलिकडे केलेली लघुशंका आढळून आली. सदर वाघ ताडोबा, नागझिरा, न्यू नागझिरा, उमरेड, कऱ्हांडला, कोका अभयारण्यात शोधूनही सापडला नाही. त्यामुळे हा वाघ हा पुरकाबोडी, तिर्री अभयारण्यातच असावा, असे घटनास्थळावरील खुनावरून दिसून येते. ‘जय’चा जन्म नागझिरा अभयारण्यातील असून त्याचे माहेरघर नागझिरा असल्याने तो या मार्गाने नागझिरा अभयारण्यात तर गेला नसावा? अशी शंका बळावली आहे. तिर्री, येटेवाही जंगलात यंत्रणा संपूर्ण कामाला लागली असून व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.पी. चंद्रात्रे, अड्याळ वनक्षेत्राधिकारी महेश पाठक यांची चमू जंगल पिंजून काढत आहेत. (वार्ताहर)कऱ्हांडला अभयारण्यात मी ‘जय’ला पाहिले आहे. त्याच्या गळ्याला पट्टा असून तो चार फुट उंचीचा आहे. तो ‘जय’ असावा असे त्याच्या वर्णनावरून दिसून आले.- मुनीश्वर काटेखाये, माजी सरपंच, चिचाळएका महिन्यापूर्वी ओढ्याशेजारी मोठा वाघ कधीच पाहिला नाही असा ढाण्या वाघ आढळला. तेवढा वाघ आम्ही या जंगलात पाहिला नाही.- अशोक सलामे, गुराखी, येटेवाही