शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यात मधुमेहाचे ३५ हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

फास्ट लाईफ व अनियंत्रित जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. जगात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास अलिकडच्या काळात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआज जागतिक मधुमेह दिन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनियंत्रित जीवन शैली आणि विविध कारणांनी भंडारा जिल्ह्यात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात ३५ हजार ७३९ मधुमेहाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ११ हजार ३४५ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. फास्ट लाईफ व अनियंत्रित जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. जगात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास अलिकडच्या काळात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा तालुक्यात ११ हजार ३४५, साकोली ४६९१, लाखनी ४११९, मोहाडी १९३६, तुमसर ४५५१, पवनी ४५५० आणि लाखांदूर तालुक्यात ४१४३ रुग्णांची नोंद करण्यात आली. असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांची तपासणी करताना जिल्ह्यात ३५ हजार ७३९ रुग्ण आढळून आले आहेत. शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त वाढणे याला मधूमेह म्हणता येईल. अग्न्याशय नावाची ग्रंथी असते. ती इंन्सुलीन नावाचे एन्झाईम निर्माण करते. शारीरिक उर्जा निर्माण करण्यासाठी आपण जे काही ग्रहण करतो त्याचे रूपांतर शेवटी शर्करेत होते. त्यामुळे शरीराचे पोषण होते. परंतु शारीरिक अडचणीमुळे इंन्सुलीन स्त्रावनाचे प्रमाण कमी होते आणि रक्ततातील साखरेचे प्रमाण कमी होते, यालाच मधुमेह म्हणतात.अशी घ्या काळजीn मधुमेहाचे निदान झाल्यानंतर दररोज ४५ मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. वेळेवर जेवण, जेवणात हिरव्या पालेभाज्या, कळधान्य आवश्यक आहे. तेलकट, तुपकट, हवाबंद खाद्यपदार्थ आणि मासाहार खाणे टाळावे, वजन वाढू देवू नये, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवक करू नये. रक्ततात साखरेचे प्रमाण साधारण १४० पेक्षा कमी असायला हवे. उपाशीपोटी १२६ पेक्षा कमी व जेवणानंतर २०० पेक्षा कमी असायला हवे.