शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

धान पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा परिणाम : शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे धान पीकावर तुडतुडा रोगाचा उपद्रव वाढत असून शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावर्षी सुरुवातीला दोन महिने पावसाचा खंड आणि नंतर सातत्याने संततधार पाऊस पडत असल्याने वातावरणात आमुलाग्र बदल झाला आहे. त्याचा परिणाम धान पिकावर होत असून अनेक रोगकिडींसह तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत असून यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बांध्यातील साठलेले पाणी काढून देवून सकाळच्या सत्रामध्ये उन्हापूर्वी फवारणी करावी.फवारणीपूर्वी धानाच्या बुंद्याजवळ बारिक निरीक्षण करुन ५ ते १० तुडतुडे आढळल्यास नुकसानीची पातळी वाढली आहे. हे समजून त्यासाठी प्रथम मॅटारायझिंग अ‍ॅनिसोपडी जैविक बुरशीनाशक १ किलो प्रति एकर या प्रमाणात बांध्यामध्ये वापरुन फवारणी करावी. रासायनिक शिफारशीप्रमाणे तुडतुडा नियंत्रणासाठी ईमिडाक्लोरोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली किंवा ट्रायझोफास ४० एलजी प्रवाही २० मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करतांना धानाच्या बुंध्यापर्यंत जाईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी दिपक अहेर, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.ओळख तुडतुड्याचीतुडतुड्याचे हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे, पांढºया पाढीचे तुडतुडे अशा तीन प्रकारचा किडांचा जीवनक्रम असून त्यामध्ये हिरवे तुडतुडे पाण्यातील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. तर तपकिरी तुडतुडे प्रौढ झाल्याने झाड्यांच्या बुंध्यामधून सतत रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाडे निस्तेज होतात तर पांढºया पाढीच्या तुडतुड्याने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामुळे चुडाच्या बाहेरील पाने करपलेली दिसतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय वेळीच करणे गरजेचे आहे. यामध्ये धान रोपाच्या लावणीपासून पट्टा पध्दत करणे गरजेचे आहे.

टॅग्स :agricultureशेती