शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

१० बंद रेतीघाटातून नियमबाह्य रेतीचा उपसा

By admin | Updated: September 9, 2016 01:38 IST

तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा, बावनथडी नद्या वाहतात. उच्च दर्जाची रेती नदीपत्रात असून या रेतीचा प्रचंड मागणी शहरात आहे.

रस्त्यांची दुरवस्था : महसूल प्रशासनाने केला आठ रेतीघाटांचा लिलाव तुमसर : तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा, बावनथडी नद्या वाहतात. उच्च दर्जाची रेती नदीपत्रात असून या रेतीचा प्रचंड मागणी शहरात आहे. तुमसर तालुक्यात १८ रेतीघाटापैकी आठ रेतीघाटांचा राज्य शासनाने लिलाव केला. इतर १० रेतीघाट केवळ कागदोपत्री बंद आहेत. या रेतीघाटातून रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासन थातुरमातूर कारवाई करून मोकळे होतात. परिणामी रस्त्यांची दूरावस्था झाली आहे.वैनगंगा तथा बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची पांढरी शुभ्र, पिवळसर दाणेदार रेती मुबलक आहे. प्रचंड रेती साठ्यामुळे रेती कंत्राटदार तालुक्यातील रेतीघाट खरेदी करतात. या रेतीची उपराजधानी नागपूर ही मोठी बाजारपेठ आहे. महसूल विभागाने सन २०१६ या वर्षात आठ रेती घाटांचा लिलाव केला. कोट्यवधींना ही रेतीघाट खरेदी करण्यात आले. यात चारगाव, बाम्हणी, तामसवाडी सि., मांडवी, वारपिंडकेपार, आष्टी, लोभी व देवनारा येथील रेतीघाटांचा लिलाव झाला. येथील रेतीघाटात रेतीचा प्रचंड साठा आहे तर उमरवाडा, सुकळी दे, पांजरा, बपेरा, घानोड, ढोरवाडा, माडगी, चांदमारा, सक्करदरा या रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. ही रेतीघाट अयोग्य मानली गेली. घाटात रेतीसाठा उपलब्ध नाही.रेतीघाट लिलाव झाले नाही त्या रेतीघाटातून मात्र नियमित मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती आहे. महसूल प्रशासन कारवाई करणे, पुन्हा उपसा सुरू होतो. ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांची कारवाई येथे संथगतीने दिसते. क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. यामुळे रस्त्यंची अगदी चाळण झाली आहे. रेतीघाट असलेली गाव रस्ते खड्डेमय झाली आहेत. अनेक आंदोलने होतात, परंतु परिस्थिती मात्र जैसे थेच दिसून येत आहे. रेती उपस्याचे अतिशय कडक नियम आहे, परंतु नियमबाह्य रेती उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन येथे हतबल झालेले दिसते.नदी पात्रात सीमांकन केले जाते, परंतु दररोज सीमांकन पाहण्याकरिता महसूल अधिकारी तथा कर्मचारी जाऊच शकत नाही. सीमा कुठून कुठपर्यंत आहेत हे सर्वसामान्यांना कळत नाही. नदीपात्र गावापासून दूर असते. कंत्राटदार हे वजनदार व श्रीमंत व्यक्ती असतात त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी तक्रार देण्याकरिता ग्रामस्थ पुढे येत नाही. महसूल प्रशासनाचे अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखनीत ६ घाटातून वाहतूक सुरूलाखनी : तालुक्यातील मऱ्हेगाव, पाथरी, भुगाव, नरव्हा, पळसगाव येथील रेतीघाट सुरू आहेत. त्यांची ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत मुदत आहे. मिरेगाव रेतीघाटाला गिट्टी उत्खननाची परवानगी ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. आज तहसिलदार राजीव शक्करवार यांनी मिरेगाव रेतीघाटातून रेतीचे उत्खनन व अवैध वाहतुक करीत असताना ९ ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर मालकावर कारवाही केली आहे.तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन केले जाते. रेतीचे रॉयल्टी व नियमानुसार वाहतुकीचे तहसिल कार्यालयाचे व पोलीस विभागाचे लक्ष असते. गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे मऱ्हेगाव, भुगाव, नरव्हा येथील रस्ते खराब झाले आहेत. लोकांना त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी व पहाटेला अवैध वाहतुक चालत असते याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)