शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाला दांडी

By admin | Updated: July 6, 2015 00:26 IST

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलैला सर्वेक्षणाचे आयोजन केले होते.

निवडणुकीचा फटका : ११ जुलैला होणार सर्वेक्षणप्रशांत देसाई भंडाराशाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यात ४ जुलैला सर्वेक्षणाचे आयोजन केले होते. मात्र, भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने हा जिल्हा याला अपवाद ठरला आहे.बालकांचा मोफत आणि सक्तीचा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यानुसार, राज्यातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी शिक्षण विभागाने पाऊले उचललेली आहे. त्यानुसार, शिक्षणात आमूलाग्र बदल केले आहेत. मागील वर्षी शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जिल्ह्यात ७३ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. सर्वेक्षणानंतरही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार, राज्यातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने ४ जुलैला राज्यात एकाच दिवशी सर्व्हेक्षण करायचे होते. भंडारा जिल्ह्यातील ८७५ गावांमधील ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करायचे होते. मात्र, ४ जुलैला भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होती. यासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले नाही. शिक्षण, महिला व बालकल्याण, महसूल, पोलीस, पालिका, कामगार आयुक्त कार्यालय, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करावयाचे आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम झाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पूर्वीच शिक्षण आयुक्त पुणे यांना माहिती देऊन तशी परवानगी घेतली. ही मोहिम ११ जुलैला राबविण्यात येणार आहे. यासंबंधाने ७ जुलैला सर्व विभागप्रमुखांची सभा बोलविली आहे. सर्वेक्षणासाठी तीन हजार कर्मचारी लागणार आहे.- एकनाथ मडावी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भंडारा.