शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागवर नियमबाह्य मुरुम खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:27 IST

शासकीय जागेतून नियमबाह्य आणि यंत्राच्या सहाय्याने मुरुम खनन होत असल्याचा प्रकार तालुक्यातील तुमसर शिवारात सुरु आहे. महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नाही.

ठळक मुद्देरूपेरा येथील प्रकार : महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासकीय जागेतून नियमबाह्य आणि यंत्राच्या सहाय्याने मुरुम खनन होत असल्याचा प्रकार तालुक्यातील तुमसर शिवारात सुरु आहे. महसूल प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नाही.रुपेरा गावशिवारात शासकीय दस्ताऐवज नोंदीनुसार ढोरफोडी भूमापन क्रमांक ४२३ साझा क्रमांक १६ येथे निश्चित करण्यात आली आहे. सुमारे अडीच एकर शासकीय जागा आहे. सदर परिसरातून यंत्राने नियमबाह्य मुरुम उत्खनन केले जात आहे. मुरुमाची लिज नसताना व्यवसायीक कामासाठी त्याचा वापर होत आहे. सदर जागेच्या बाजूला खासगी शेत असतानाही मुरुमाचे उत्खनन होत आहे. या परिसरात मुरुमाचा मुबलक साठा आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. दिवसाढवळ्या जेसीबीद्वारे उत्खनन केले जात आहे. शासकीय जागेतून मुरुम उत्खनन सुरु असताना स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी मात्र येथे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. परिसर पोखरला जात असून शासनाचा लाखोंचा महसूलही बुडत आहे. कुणीच या प्रकाराबाबत विचारणा करायला तयार नाही. निवडणूक कामात प्रशासन व्यस्त आहे तर दुसरीकडे गौण खनिजाची राजरोस तस्करी सुरु आहे. या प्रकाराबाबत संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे या उत्खननामुळे लगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे.