शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

काशीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

By admin | Updated: September 10, 2015 00:25 IST

साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा (राजेश) काशीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

साकोली : साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळा (राजेश) काशीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आमदार निधी अंतर्गत साकोली तालुक्यातील किन्ही, एकोडी, पिंडकेपार, सेंदूरवाफा, उमरी, परसोडी, कुंभली, सुकळी, पळसगाव, लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ), गडेगाव, चान्ना, लाखोरी, किटाळी, मेंढा (भूगाव), लाखांदूर तालुक्यातील मळेघाट, लाखांदूर, मोहरणा, मांढळ, विरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल प्रोजेक्टरचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सेंदूरवाफा प्राथमिक शाळेत गुरुवारला दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे.तरुण वर्गाला शैक्षणिकदृष्ट्या प्रेरणा मिळावी या दृष्टिने सरश्री यांच्या पुस्तकसंचाचे वाघाये कनिष्ठ महाविद्यालय एकोडी, चैतन्य महाविद्यालय बाम्पेवाडा, एम.बी. पटेल कॉलेज साकोली, एन.पी. वाघाये कॉलेज लाखनी, समर्थ महाविद्यालय लाखनी, विदर्भ महाविद्यालय लाखनी, एन.पी.के. कॉलेज किटाळी, सिद्धार्थ महाविद्यालय लाखांदूर, वाघाये कॉलेज लाखांदूर, हिरालाल खोब्रागडे महाविद्यालय डोकेसरांडी, हिरालाल खोब्रागडे महाविद्यालय विरली, गंगाराम महाविद्यालय मासळ, निर्धनराव वाघाये महाविद्यालय दहेगाव, दैठणकर महाविद्यालय बारव्हा येथे कार्यक्रम होईल.यावेळी नागपूर येथील डॉ.हेडगेवार रक्तपेढी व स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यात दिघोरी (मोठी), तैलिक समाज सभागृह मासळ, आरोग्य केंद्र बेलाटी, आरोग्य केंद्र कुडेगाव, आरोग्य केंद्र बारव्हा, आरोग्य केंद्र सरांडी पुयार, संत तुकडोजी महाराज सभागृह, लाखांदूर, साकोली तालुक्यात सेंदूरवाफा ग्रामपंचायत कार्यालय, बाजार चौक एकोडी, आरोग्य केंद्र विर्सी, सावरबंध ग्रामपंचायत कार्यालय, सानगडी, शिवमंदिर वडद, ग्रामपंचायत कार्यालय साकोली, जिल्हा परिषद हायस्कुल, लाखनी क्रीडा संकुल, समर्थनगर लाखनी, पिंपळगाव आरोग्य केंद्र मुरमाडी, आरोग्य केंद्र सालेभाटा, आरोग्य केंद्र पालांदूर, साई मंदिर बाजार चौक आणि पोहरा ग्रामपंचायत कार्यालयात येथे आयोजित करण्यात आला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)