शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या समस्यांना घेऊन संघटना पोहोचली मंत्रालयात

By admin | Updated: October 25, 2016 00:26 IST

जिल्ह्यात कार्यरत विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील अनेक दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत.

कास्ट्राईब महासंघ : विविध समस्यांबाबत निवेदन सादरभंडारा : जिल्ह्यात कार्यरत विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील अनेक दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यावर तोडगा निघावा यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन निवेदन दिले. कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबद संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांना वारंवार निवेदन देऊनही कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाहीत. त्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेऊन समस्यांचे निवेदन दिले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर स्थानांतरणाने भंडाऱ्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलण्यात आली असून पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. जि.प. मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी, गोंडउमरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका यांना ५ टक्के मानधन वाढीचा लाभ देण्यात यावा, भूविकास बँकेचे ३६ महिन्यांचे थकीत पगार देण्यात यावे, बिंदू नामावली संबंधाने चर्चा करण्यात आली. वसतिगृहातील कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, नक्षलग्रस्त तालुक्यातील कंत्राटी ए.एन.एम., एल.एच.व्ही., एस.एन. यांना २००७ पासून नक्षलग्रस्त वेतनाची थकबाकी देण्यात यावी, प्रसुती रजेचा पगार तात्काळ देण्यात यावा आदी विषयांच्या समस्या निवेदनातून देण्यात आल्या. शिष्टमंडळात महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, प्रभू ठवकर, वामन धकाते, सिंधू राऊत, ए.बी. गजभिये, प्रा.मधुकर ऋश्वेश्वरी, प्रा.विनोद मेश्राम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)