शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

आरोपींना सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश

By admin | Updated: May 29, 2014 01:55 IST

येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांनी बुधवारी, दुपारी २.४५ वाजता तुमसर येथील ...

तुमसर

 

: येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांनी बुधवारी, दुपारी २.४५ वाजता तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अ.अ. घाणीवाले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकार्‍यांनी सातही आरोपींना ९ जून रोजी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचा आदेश सुनावला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपींना न्यायालय परिसरात आणले त्यावेळी आरोपींच्या कुटुंबियांसह नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांनी गर्दी केली होती.

दि

.२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री हे तिहेरी हत्याकांड घडले होते. तीन महिन्यानंतर तुमसर पोलिसांनी (दि.२७) ला सात आरोपींविरुद्ध ८00 पानांचे आरोपपत्र दाखल केले. आज बुधवारी शाहनवाज उर्फ बाबू सत्तार शेख, महेश आगाशे, सलीम नजीर खान पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले (सर्व रा.तुमसर), सोहेल शेख, रफीक शेख रा.नागपूर या सातही आरोपींना तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अ.अ. यांच्या समक्ष हजर करण्यात आले.

न्यायाधीश

घाणीवाले यांनी मराठी, हिंदी कळते काय? या खटल्यात वकील लावला का? असे प्रश्न विचारले. आरोपींनी दोन्ही भाषा कळतात व वकील अँड.उत्तम शहारे यांचे नाव सांगितले. यावेळी न्यायाधीश अ.अ. घाणीवाले यांनी दि. ९ जून रोजी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला.

जामिनाकरिता

सातही

अर्ज करणार -अँड.उत्तम शहारे आरोपींच्या जामिनाकरिता दि. २९ मे रोजी भंडारा सत्र न्यायालयात अर्ज करणार आहे. भंडारा - तुमसरचे अंतर ३५ कि.मी. आहे. खुनाचा खटला हा जिल्हा सत्र न्यायालयात चालतो. जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला तर उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे आरोपींचे वकील अँड. उत्तम शहारे यांनी सांगितले.

आरोपपत्रासाठी

सोनी

(

विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची मदत हत्याकांड प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, याकरिता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपपत्र कसे तयार करावे याबाबत सूचना केली आहे. ८00 पानांच्या आरोपपत्रात प्रत्येक बिंदूवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व निकाल त्वरीत लागावा याकरिता हा खटला जलदगती न्यायालयात चालणार आहे. या खटल्यात एका आरोपीला सरकारी साक्षीदार करण्याची शक्यता आहे. तालुका प्रतिनिधी)