शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी व डेली अटेन्डन्सला शिक्षकांचा विरोध

By admin | Updated: January 10, 2017 00:39 IST

बोगस विद्यार्थी संख्या दाखवून अनेक शाळांमध्ये शासनाचे अनुदान लाटण्यात येते.

शिक्षक कृती समितीचा निर्णय : मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : बोगस विद्यार्थी संख्या दाखवून अनेक शाळांमध्ये शासनाचे अनुदान लाटण्यात येते. यावर आळा बसावा व विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून त्यांची हजेरी घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने राज्यात ‘सेल्फी, डेली अटेन्डन्स’ची अंमलबजावणी केली. मात्र यामुळे शिक्षकांना याचा अतिरिक्त त्रास होत असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी याला विरोध केला असून त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक कृती समितीच्या वतीने हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. याबाबत त्यांनी आज सोमवारला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अभयसिंह परिहार यांना निवेदन दिले. यात सेल्फीवर बहिष्कार टाकीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षण प्रशासन व शिक्षक आता सेल्फीवरून आमोरेसामोरे उभे ठाकले आहेत. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०१६ ला सेल्फी काढण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी जानेवारी २०१७ पासून करण्याचे सुतोवाच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. सर्व शाळातील विद्यार्थ्यांची वर्गनिहाय सेल्फी काढून ती सरलवर पाठविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिलेल्या आहेत. अगोदरच शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कामांचा बोझा शिक्षकांवर असल्याने या अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांचे विद्यादानाकडे दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी घडविताना शिक्षकांना या कामातून मोकळे करावे व सेल्फीचा घेतलेला राज्य शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी जिल्ह्यातील शिक्षक कृती समितीने सेल्फी व हजेरीपट यावर बहिष्कार घातला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून अगोदरच शाळांची सरल, एमडीएम, शिष्यवृत्ती, आधारकार्ड यासह अन्य शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना सहभागी करून घेतात. शाळांच्या विद्यार्थ्यांची अद्यावत माहिती आता शिक्षण विभागाने संगणकीकृत पद्धतीने भरण्याची अंमलबजावणी केली असल्याने शिक्षकांसाठी ती डोकेदुखी ठरू पाहत आहे. अशात सेल्फी व रोजनिशी पटसंख्येची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाहीत. तर अनेक शाळांमध्ये विद्युत जोडणी नसल्याने ही प्रक्रिया राबविताना अडचणी निर्माण होत आहेत. याखेरीज अध्यापनाचा अमुल्य वेळ वाया जात असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर फरक पडणार आहे. आॅनलाईन हजेरी व सेल्फीसारखे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आॅनलाईन माहिती भरणे व सेल्फी काढण्याच्या निर्णयावर राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाविरुद्ध बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात शिक्षक कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, युवराज वंजारी, ईश्वर ढेंगे, वसंत साठवणे, सुधीर वाघमारे, महेश गावंडे, मुकुंद ठवकर, संदीप वहिले आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)