शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससी परीक्षाविनाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:31 IST

संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न करताच भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या करणारी अधिसूचना सरकारने रद्द करावी, या पदांना आरक्षण लागू करावे याकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री व महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अधिसूचना रद्द करण्याची कास्ट्राईब महासंघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण न करताच भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या थेट नियुक्त्या करणारी अधिसूचना सरकारने रद्द करावी, या पदांना आरक्षण लागू करावे याकरिता महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री व महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले आहे.भारतीय प्रशासन सेवेतील सनदी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच गुवत्तेच्या आधारे करण्याच्या पद्धतीला छेद देत, भारत सरकारने एक अधिसूचना काढून केंद्र सरकारच्या दिल्लीस्थीत दहा महत्वाच्या खात्यामध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण न होताच धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या सहसचिवांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर खाजगी क्षेत्रात व परदेशी कंपनीत काम करणाºयांनाही संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण न होताच सहसचिव दर्ज्यांच्या नियुक्यांचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारची धोरणात्मक व नितीगत निर्णय घेण्यास सक्षम असणारी ही सरकारी पदे भरताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांच्या आरक्षीत पदांचा विचार सरकारने केला नसल्यामुळे या जाती जमातीचे प्रशासकीय सेवेतील प्रमाण काहीच राहणार नाही. आधीच मागासवर्गीयांची सनदी, प्रशासकीय व वरिष्ठ स्तरावरील आरक्षीत पदे रिक्त असून ती न भरल्यामुळे मागासवर्गीयांचा अशा पदांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे, असे असताना आरक्षणाचा विचार न करता, सरळ पद्धतीने अशी पदे थेट भरणे म्हणजे केंद्रातील सनदी, प्रशासकीय व धोरणात्मक निर्णय घेणाºया वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नौकरीतील आरक्षण संपविण्यासारखे आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मागासवर्गीयांचा सहभाग सुद्धा राहणार नाही.भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांकरिता आवश्यक असलेली युपीएससीची परीक्षा नाकरणारी सरकारची ही अधिसुचना म्हणजे भारतीय राज्य घटनेच्या कलम १६ (४) चे सरळ सरळ उल्लंघन आहे. सरकारने कोणत्याही स्तरावर राज्यांच्या व केंद्रांच्या सेवामध्ये पर्याप्त संख्येत प्रतिनिधित्व नाही, अशा वर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्याची तरतुद या कलम १६ (४) मध्ये आहे.भारत सरकाने सहसचिव दर्ज्यांचीच नव्हे तर इतरही अनेक उच्च दर्जाची व महत्वाची मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांची पदे पर्याप्त संख्येत भरलेली नसताना, आजही अशी अनेक पदे रिक्त असताना आरक्षित पदांना डावलल्या जात आहे.त्यामुळे भारत सरकारने युपीएससीच्या परीक्षा न घेताच केंद्रात सहसचिव स्तरावरील करावयाच्या थेट नियुक्त्यांची अधिसूचना रद्द करावी, मागे घ्यावी, फेरविचार करावा, या अधिसूचनेनुसार भरावयाच्या पदांना नियमानुसार आरक्षण लागू करण्यात यावे, या अधिसूचनेनुसार भरावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट पद्धतीने होणारी निवड स्थगीत करावी, युपीएससीच्या परीक्षा घेऊनच अधिसूचनेतील प्रशासकीय पदे भरण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.संघटनेच्या शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय जेष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, भंडारा जिल्हा अध्यक्ष गुलशन गजभिये, जिल्हा सचिव नरेंद्र बन्सोड, पी.डी. शहारे, हिवराज उके, डी.एफ. कोचे, आदिनाथ नागदेवे, आनंद गजभिये, मोरेश्वर गेडाम, ए.पी. गोडबोले, एम.डब्ल्यु. दहिवले, इंजि. रूपचंद रामटेके, एम.यु. मेश्राम, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, संजय बन्सोड, ए.टी. बागडे, एम.एच. गडकरी आदींचा समावेश होता.