शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माहितीदूतमुळे समाजसेवेची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:27 IST

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवितांना तसेच जॉब मिळविण्यासाठी मदत होणार आहे.

ठळक मुद्देकेशव वाळके : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व युनिसेफच्या सहकार्याने युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवितांना तसेच जॉब मिळविण्यासाठी मदत होणार आहे. या उपक्रमात युवा माहितीदूतास प्रत्येकी ५० व्यक्तींना शासनाच्या योजनांची माहिती द्यावयाची आहे. सदर उपक्रम विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणाकडे लक्ष देवून ६ महिन्याच्या कालावधीत करावयाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समाज सेवेची संधीही मिळणार असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना अनेक शासकीय योजनांची माहितीही मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापिठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके यांनी केले.साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात युवा माहितीदूत उपक्रमाची जिल्हास्तरीय कार्यशाळा राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रा. अशोक चुटे, रा.से.योजनेचे समन्वयक डॉ. किशोर नागपूरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रा. सि.जे. खूणे, एल. पी. नागपूरकर, प्रा. शिवनकर, प्रा. धरम शहारे उपस्थित होते.पदवीधर झाल्यानंतर नोकरी व करिअर यामधील फरक विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, करिअर म्हणजे स्वत: व्यवसाय करुन किंवा मेहनत करुन आत्मनिर्भर होणे व सक्षम होऊन दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे होय. स्वत:च्या विकास सोबतच दुसºयांचाही विकास करा, अशी विद्यार्थ्यांशी संवादात्मक चर्चा डॉ. केशव वाळके केली.युवा माहिती दूत उपक्रमात ३० वैयक्तिक लाभाच्या योजना व १० सामूहिक योजना आहेत. त्यांची माहिती लोकांना पटवून द्यावयाची आहे.त्यासाठी या योजनांचा अभ्यास माहिती दूतांनी करावा व योजनेची माहिती लोकांना द्यावी. अभ्यासाव्यतिकरीक्त वेळेचे व्यवस्थापन करुन हे काम करावे. विद्यार्थी स्वत: युवा माहितीदूत या अप्लीकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करु शकतात. युवा माहिती दूत अशी ओळख मिळेल व राज्य शासनाच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे केशव वाळके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी यांनी युवा माहितीदूत उपक्रमाचे सादरीकरण केले.प्रा. चुटे यांनी ५० योजनेचा या युवा माहिती दूतातर्फे प्रसार व प्रचार होणार आहे. त्यामुळे तळागाळातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेची माहिती मिळेल, असे सांगितले.प्रास्ताविकात किशोर नागपूर यांनी सांगितले की, युनिसेफच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारा युवा माहिती दूत हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एक मार्गदर्शन नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. संचालन प्रा. शिवनकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विभागीय कार्यक्रम अधिकारी प्रा. धरम शहारे यांनी मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.