शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ येथे आॅपरेशन मुस्कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:29 IST

अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सोनेगावमधून एक अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती.

सोनेगाव येथील घटना : गुजरातमधून दोघांना पकडलेलोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ / चिचाळ : अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या सोनेगावमधून एक अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. ती कोणासोबत गेली, तशी तक्रार मुलीच्या आईने दिली होती. त्यामुळे आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अड्याळ पोलीसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत शोध घेत सदर मुलगी व १८ वर्षीय तरूणाला गुजरात राज्यातून जिल्ह्यात परत आणल्याची माहिती पोलिस निरिक्षक ढोबळे यांनी दिली. सदर मुलगी अल्पवयीन आहे, घरातील कोणत्याही व्यक्तीला न सांगता पीडित मुलगी एका मुलासोबत पळून गेली होती. सोनेगाव इथून आठ दिवसाआधी दोन मुली पळून गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यापैकी एका मुलीला नागपुरहून काही दिवसांआधी पकडण्यात आले होते. परंतु या पीडित अल्पवयीन मुलीचा मात्र शोध लागला नव्हता. मुलीच्या आईला मुलीला शोधून आणण्याचा शब्द तर दिला होता पण शोध मात्र लागला नव्हता आणि त्यामुळे येथील पोलीस मोठ्या बिकट परिस्थितीत अडकले होते.जिल्हा पोलीस अंतर्गत ‘आॅपरेशन मुस्कान’हा उपक्रम सुरु आहे. मुलगी घरातून पसार झाल्यामुळे तीचा शोध घेणे आव्हान ठरले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.विनिता साहू, जिल्हा पोलीस सहाय्यक अधीक्षक रश्मी नांदेडकर तसेच पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर ठिकस यांच्या मार्गदर्शनात अड्याळचे पोलीस निरिक्षक सुरेश ढोबळे, पीएसआय एन.सी. डोंगरे व पोलीस कर्मचाऱ्यांंना या प्रकरणात यश लाभले. जिथून माहिती मिळत गेली तिथे पोलिसांची चमू मुलीच्या शोधातच होती. अखेर तो दिवस उजाडला आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकू लागले. मुलगी गुजरातमध्ये असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्याच दिवशी पोलिसांनी गुजरात राज्य पोलिसांशी संपर्क साधला. तिथे जावून मुलीला ताब्यात घेतले. मुलीला आईच्या स्वाधीन करण्यात आले.