शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

वीज वितरण कार्यालयाचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: April 28, 2015 00:28 IST

वीज वितरण कंपनी शाखा कोसरा व कोंढा या दोन कार्यालयांतर्गत ४४ गावांचा कारभार चालतो.

कोंढा कोसरा येथील प्रकार : ४४ गावांच्या ग्राहकांकडे दुर्लक्षकोंढा (कोसरा) : वीज वितरण कंपनी शाखा कोसरा व कोंढा या दोन कार्यालयांतर्गत ४४ गावांचा कारभार चालतो. पण येथील कारभार रामभरोसे असून दोन्ही शाखा अभियंता कार्यालयात गैरहजर राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसरात्र वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान कोणी करावे, असा प्रश्न पडला आहे. याकडे सहाय्यक अभियंता यांचे दुर्लक्ष करीत आहे.सर्वात मोठी डोकेदुखी सध्या वीज वितरण विभाग कोंढा व कोसरा शाखेची आहे. कोसरा या शाखेत कनिष्ठ अभियंता लक्ष्मीनारायण मेश्राम हे कार्यरत आहेत. २२ गावातील ५ हजार वीज ग्राहकांचा संबंध या कार्यालयाशी येतो. मात्र दोन महिन् यांपासून लक्ष्मीनारायण मेश्राम हे कनिष्ठ कार्यालयात सतत गैरहजर आहेत. कोंढा येथील कार्यालयात सहाय्यक लाईनमन व दोन मदतनिस असे मंजूर कर्मचारी आहेत. परंतु एक सहाय्यक लाईनमनचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे दोन मदतनिस कोंढा कार्यालयाचा कारभार सांभाळीत आहेत. कोंढा हे मोठे गाव कोसरा कनिष्ठ अभियंता कार्यालयांतर्गत येते. या गावाची लाईन नेहमी रात्रीला केव्हाही जाते. लाईन ट्रीप होण्याचे प्रकार भर उन्हाळ्यात रात्रीला होत आहे. पंखे, कलर, मोटारपंप, दिवे सुरु राहत असल्याने वीजभार कमी पडतो. तेव्हा यासाठी २५ के.व्ही. ट्रान्सफार्मर लावणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कोंढा यांनी मासिक सभेत ठराव ठेवून मागील वर्षी या कार्यालयास कळविले. पण त्यासंबंधी अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. कोंढा येथे वॉर्ड क्रमांक एकमध्ये लोखंडी खांब पूर्णत: खालून जंग चढले केव्हाही पडून मोठा धोका होऊ शकतो. तुकडोजी पुतळा ते पायल टॉकीज या रस्त्यावरील खांब त्वरीत बदलविण्यात यावे असा ठराव ग्रामपंचायतने दिला. पण याकडे शाखा अभियंता लक्ष देत नाही.कोसरा कार्यालयात कनिष्ठ अभियंता भोयर कार्यरत आहेत. त्या रजेवर असल्याने येथे आठ दिवसातून एक दिवस पवनी येथून चव्हाण काम पाहण्यासाठी येतात. २२ गावचे ४ हजार ग्राहक यांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोसरा शाखेत शेतकऱ्यांचे कृषीपंप सर्वात जास्त जोडणीकरिता अर्ज आहेत. अनेक शेतकऱ्यांनी डिमांड भरून दिले. पण वीज जोडणी करून दिली नाही.कृषीपंप जोडणीची प्रतिक्षा यादी कोसरा शाखेत लावली आहे. पण येथे कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाने शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेऊन वीज खांब उभे केल्याची चर्चा आहे. या संबधी सहाय्यक अभियंता पवनी यांना विचारले असता प्रतिक्षा यादीतील अगोदरच्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन देल्याचे फोटो काढून आणा मग कारवाई करतो असे म्हणून वेळ मारून नेत आहेत. (वार्ताहर)अवैध वीज कनेक्शन वाढलेकोंढा, कोसरा कार्यालयांतर्गत अनेक कृषीपंप सुरु आहे. एका कृषीपंपाच्या कनेक्शनवर २ मोटारपंप लावले जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे विजेवर चालणारे थ्रेशर मशीन आहेत. ते देखील रात्रीला अवैध कनेक्शन रब्बी पिकाची मळणी करीत आहे. अवैध कनेक्शन वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पकडले तर शेतकरी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पकडून आपले मोटारपंप, वायर, कार्यालयातून परत नेतात. अवैध वीज कनेक्शन घेणारे वीज कर्मचाऱ्यांना धमक्या देखील देतात. अधिकारी कार्यालयात राहत नसल्याने मदतनिस यांच्यावर कार्यालय व ग्राहकांना सांभाळावे लागते. तरी येथील कार्यालयात दोन्ही शाखा अभियंता यांनी हजर राहून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.कोसरा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता लक्ष्मीनारायण मेश्राम यांना काविळ आजार झाल्याने ते रजेवर आहेत. त्यांचा चार्ज माझेकडे आहे. मी आठवडी बाजार व इतर दिवशी पवनी येथून कोसरा कार्यालयात हजर असतो. कोंढा फिडर ज्या रोहित्रावर आहे त्यावर जास्त भार होत आहे. त्यामुळे बंद पडतो.यावर उपाय म्हणून नवीन १० एम.व्ही.ए. लावले आहे. त्यास विद्युत निरीक्षक यांनी तपासले असून त्यांचे प्रमाणपत्र आल्यानंतर ते सुरु करण्यात येईल. वीज जाण्याचे प्रकार थांबतील.-पंकज मेश्रामकनिष्ठ अभियंता, कोसरा.