शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची खुलेआम तस्करी सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

वैनगंगा नदीसह चुलबंद, सूर व बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येतो. विशेषत: तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व भंडारा हद्दीतील रेतीघाटामधून रेतीची तस्करी होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीमाफियांनी नवीनच शक्कल लढविली आहे. रेतीची मोठ्या प्रमाणात डम्पींग करण्यात येऊन त्याची नंतर ट्रॅक्टर व टिप्परमधून विल्हेवाट लावण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा महसूल पाण्यात : शहरातूनही धावताहेत रेतीचे ट्रॅक्टर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याला वरदान लाभलेल्या रेती या गौण खनिजाची खुलेआम तस्करी सुरु आहे. रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा शहरातूनच रेती भरलेले ट्रॅक्टर धावत आहेत. याला प्रशासनाची मूक संमती म्हणावी काय? अशी चर्चाही जनमानसात सुरु आहे.वैनगंगा नदीसह चुलबंद, सूर व बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येतो. विशेषत: तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व भंडारा हद्दीतील रेतीघाटामधून रेतीची तस्करी होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीमाफियांनी नवीनच शक्कल लढविली आहे. रेतीची मोठ्या प्रमाणात डम्पींग करण्यात येऊन त्याची नंतर ट्रॅक्टर व टिप्परमधून विल्हेवाट लावण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वीच मोहाडी तालुक्यात डम्पींग केलेला रेतीचा साठा जप्त करून त्याची एका कंत्राटदाराला ती रेती अलॉट करण्यात आली होती. याबाबतही तालुक्यात खमंग चर्चा रंगली होती. तुमसर तालुक्यातही रेती तस्करांचा हैदोस असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे खणन सुरु आहे. विशेष म्हणजे तस्करांनी काही नदीघाटांवर मातीचा थर घालून नदीपात्रात जाण्यासाठी रस्त्याच तयार केला होता. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर हा रपटा फोडण्यात आला होता. गोंदी, ढिवरखेडा अंतर्गत बघाडी डोहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा रपटा होता. तसेच शेतातून पांधन रस्ता तयार करून तस्करांनी शेतशिवारातून बेकायदेशिररित्या रेतीची तस्करी सुरु केली होती. ठिकठिकाणी रेतीचे ढिगारेही दिसून येत होते. प्रशासनाने वेळीच रेतीघाटांचे लिलाव करून महसूल गोळा करावा अशी मागणी आहे.लिलाव केव्हा होणार?जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव केल्यास शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळू शकतो. प्रक्रिया लांबत असल्याने रेतीघाटांमधून रेतीची तस्करी थांबण्याचीही प्रक्रिया थांबू शकेल. मात्र चोरटे विविध शक्कल लढवून रेतीचे खणन करीत आहे. यावर आळा घालण्याची मागणी आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी