शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ एटीएमचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:36 IST

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर विविध ११ ठिकाणी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना २४ तास पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची बँक : २४ तास पैसे मिळण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर विविध ११ ठिकाणी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना २४ तास पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यातील सिहोरा, गोबरवाही, सानगडी, दिघोरी, पहेला येथे या एटीएम केंद्राचे लोकार्पण खासदार मधुकर कुकडे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक कैलाश नशिने, कमाल शेख, हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, ढबाले, शैलेश मिश्रा, बांडेबुचे, तुरकर, दिलीप सोनवाने, बाळकृष्ण गाढवे, हरेंद्र राहांगडाले, पत्रकार बेलूरकर, रामदयाल पारधी, रामलाल चौधरी, योगेंद्र हेडाऊ, नरेंद्र बुरडे, सत्यवान हुकरे, सरव्यवस्थापक संजय बरडे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील फुंडे म्हणाले, बँक शेतकऱ्यांच्या हिताकरिता नेहमीच सकारात्मक काम करीत असते. शेतकऱ्यांची बँक म्हटल्यावर व ग्रामीण बँकेत होणारी गर्दी व ग्राहकांना बँक सेवेचा लागणारा वेळ लक्षात घेऊन जिल्हा बँकेने प्रत्येक शाखेत एटीएम सुरु करण्याचा मानस केला आहे. या सेवेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे आमचे एटीएम कधीही कॅशलेस राहणार नाही. २४ तास पैशाची सुविधा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना खासदार मधुकर कुकडे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहत असून शेतकºयांना ती आपली बँक वाटते. गोरगरीबांच्या व शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणून या बँकेची ख्याती आहे.शासनाच्या विविध योजना येथे राबविल्या जाते. जिल्हा बँकेचा डोलारा अध्यक्ष सुनील फुंडे व संचालक मंडळामुळे सुस्थितीत उभा असल्याचे खासदार कुकडे यांनी सांगितले. कार्यक्रमाला ठिकठिकाणचे शेतकरी, बँकेचे ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.सिहोरा येथे एटीएमचा शुभारंभचुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील सिहोरा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत एटीएमचा शुभारंभ खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, संचालक रामलाल पारधी, सरव्यवस्थापक संजय बरडे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, माजी सभापती कलाम शेख, हिरालाल नागपुरे, बुरडे, योगेश हेडाऊ, शैलेश मिश्रा, पटेल उपस्थित होते. संचालन व्यवस्थापक मंगेश बोरकर यांनी केले.