शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महापुरानंतर शेतात केवळ तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात.

ठळक मुद्देशेतशिवारात स्मशान शांतता : शेतजमीन गेली खरडून, पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून पूर ओसरल्यानंतर आता भात शेतात केवळ वाळलेले तणस शिल्लक दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकºयांत नैराश्य पसरले असून अद्यापही प्रशासनाकडून मदतीचे ठोस आश्वासन मिळाले नाही.वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात. दोन दिवस जरी पुराचे पाणी शेतात थांबले तरी धानपिकाला फारसा फरक पडत नाही. पीक वाळत नाही. मात्र यावर्षी पूर ओसरल्यानंतर शेतात वाळलेले तणसच दिसत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे कळायला मार्ग नाही.यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना दोनदा पुराचा फटका बसला. हिरवेगार पीक नेस्तनाबूत झाले. शेतजमिन खरडून गेली. पहिल्या पुरानंतर आठवडाभराच्या अंतराने दुसरा पूर आला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. करडी परिसरात पुरामुळे २२ गावातील तीन हजार हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकरी शेतात जातात तेव्हा समोरील दृष्य पाहून डोळ्यात आसवांचा महापूर आल्याशिवाय राहत नाही. बी - बियाणे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. परंतु वैनगंगेच्या महापुराने सर्वकाही वाहून नेले. आता शासनाकडून सर्वेक्षण सुरु आहे. परंतु ठोस मदतीचे अद्यापही आश्वासन मिळाले नाही. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न असून घर संसार चालविण्यासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी २० हजाराची मदत जाहीर केली. राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत एक रुपयाही मदत शेतकºयांना मिळाली नाही. अनेक शेतकरी देशोधडीला लागले असून या शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा अशी मागणी आहे.महापुरात जिल्ह्यातील ४३ हजार व्यक्ती बाधितभंडारा : जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुराचा १४४ गावांना फटका बसला असून त्यात ४३ हजार २८४ व्यक्ती बाधीत झाले आहेत. ४ हजार ७३६ घरे उद्ध्वस्त झाली असून ६७३ घरे पूर्णत: तर ४ हजार ६३ घरे अंशत: बाधीत झाली आहेत. महापुरात ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून एक जण जखमी झाला. ३२० पशूधन पुरात वाहून गेले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका भंडारा तालुक्याला बसला. ४५ गावातील ५२०९ कुटुंब या महापुराच्या तडाख्यात सापडले. १३४१ घरे उद्ध्वस्त झाली असून त्यात ४११ घरे पूर्णत: तर ९३० घरे अंशत: बाधित झाली आहेत. ६९ गोठे महापुराच्या तडाख्यात सापडली असून २६३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

टॅग्स :floodपूर