शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या उरल्या नावापुरत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:15 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत ...

ठळक मुद्देउद्देशापासून फारकत : पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच सोडविता यावे आणि गावात शांतता प्रस्तापित करता यावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तंटामुक्त समित्यांची संकल्पना अस्तित्वात आणली. संपूर्ण राज्यात समित्यांची ग्रामपंचायतीत ठराव घेऊन स्थापना केली. यामध्ये तंटामुक्त मोहीम राबवून गाव तंटामुक्त करण्याच्या समित्यांना लाखो रुपयाचा पुरस्कारही दिल्या जातो. आजमितीस भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. मात्र अनेक समित्यांचे काम केवळ कागदोपत्री सुरु असल्याचे वास्तव्य दिसून येते. बहुतांश पुरस्कारप्राप्त गावातच आता तंटे होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर येत आहे. बºयाच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यसनाधिन व अवैध धंद्यांना शह देणारे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचा असल्याचा उद्देश सफल होण्याबाबत शासंकता निर्माण होत आहे. बऱ्याच दिवसांपासून तंटामुक्त समित्या आपल्या उद्देशापासून फारकत घेत असल्याने पोलीस प्रशासनाला आजही गावात वादविवादाप्रसंगी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे समित्यांच्या कर्तव्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज आहे.जिल्हा पोलीस प्रशासनानेही तंटामुक्त समित्यांच्या अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे. अन्यथा गावातील तंटे गावात सुटण्याऐवजी ते वेशीबाहेर येऊन त्याची नक्कीच पोलिसात तक्रार पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.समित्या निरुत्साहीतंटामुक्त समित्यांनी जर खरोखरच जर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविल्यास समाजात जनजागृती होऊ शकते. परंतु समित्याच जर निरुत्साही असतील तर समित्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अशी आहेत तंटामुक्तीची कर्तव्येगावातील संपूर्ण दारुबंदी करून अनिष्ट चालीरिती, परंपरांना प्रतिबंध करणे, त्याचबरोबर विविध उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविणे, वनसंवर्धन व वनसंरक्षण करणे, ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय गावातील तंटे गावातच सामंजस्याने सोडविण्याबरोबर समित्यांनी गणेशोत्सव, बकरी ईद, ईद ए मिलाद आदी धार्मिक कार्यक्रम पोलीस संरक्षणाविना साजरे करणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे अशी समितीची कर्तव्य असले तरी एकही पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.