शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षात केवळ ५१ लाभार्थी

By admin | Updated: January 22, 2015 00:31 IST

अपंगबाधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनातर्फे अपंग वित्त व विकास महामंडळ सुरु करण्यात आले.

भंडारा : अपंगबाधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनातर्फे अपंग वित्त व विकास महामंडळ सुरु करण्यात आले. मात्र महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे मागील आठ वर्षांपासून जिल्ह्यातील केवळ ५१ अपंगांनीच या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला आहे.अपंगांना अपंगत्व हे शाप न वाटता तो वरदान वाटले पाहिजे, अशी कटीबध्दता अपंग वित्त व विकास महामंडळाची आहे. या माध्यमातून अपंग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात वैयक्तिीक थेट कर्ज योजना, मुदत कर्ज योजना, वाहन कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, शैक्षणिक कर्ज योजना, युवा स्वावलंबन योजना, मानसिक विकलांग अपंगांच्या पालकांसाठी स्वयंरोजगार योजना, मतीमंद व्यक्तिंच्या पालकांच्या संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना, अपंग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजनांचा समावेश आहे. मात्र महामंडळाच्या योजनांसाठी विविध प्रकारची प्रकारची कागदपत्रे अर्जासोबत मागविण्यात येत असल्यामुळे अर्जदारांची चांगलीच दमछाक होते. सोबत अनुदान मिळत नाही, साक्षिदार असणे आवश्यक आहे. याप्रमाणे अर्ज सादर करतांना अनेक आव्हाणे पुढे येतात. त्यामुळे लाभासाठी अर्जदार उदासिन दिसून येतात. भंडारा जिल्ह्यात अपंग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून सन २००६ ते आजपर्यत केवळ ५१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यावर्षी १०० अर्ज मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगबांधवांची नेहमी धावपळ दिसून येते. त्यांना अर्ज मिळविण्यासाठी काटकसर केली जाते. मात्र भंडारा जिल्ह्यात स्थिती मात्र उलट आहे. ही उदासिनता का आहे, यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.राज्यात अपंगांची संख्या २९ लाखांवर राज्यात २०११ च्या जणगणनेनुसार अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, मानिसक आजार, बहुविकलांग अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींची संख्या सुमारे २९ लाख ६४ हजारांहून अधिक आहे. अपंग व्यक्तींना समान संधी मिळावी त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे तसेच सक्षम व्यक्तींची स्पर्धा करण्याचे बळ त्यांच्यात यावे, यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयाने २०१२ मध्ये सरकारला १८ योजनांचा प्रस्ताव पाठविला होता. यामध्ये बेघर, अपंगासाठी, वैयिक्तक घरकूल योजना, स्पर्धा, परीक्षापूर्ण, प्रशिक्षण केंद्र, मतिमंद, विकलांग, बहुविकलांग व गंभीर अपंगत्व असणाऱ्या प्रौढांसाठी आधारगृह, अपंग कल्याण आयुक्तालयाचे संकेतस्थळ तयार करणे, जिल्हास्तरावर अपंग पुनर्वसन केंद्राची स्थापना करणे स्वरोजगारासाठी आवश्यक बिजभांडवल पुरवठा करणे, व्यापारी गाळे बांधणे, व्यवसाय प्रशिक्षण शालांत परीक्षेतर शिक्षणासाठी अपंगाना शिष्यवृत्ती देणे, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने देणे आदी योजनांचा समावेश आहे.