शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाकाडोंगरी येथील वनक्षेत्र सहायकाला एक वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:52 IST

सागवान फर्निचर जप्त प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वीस हजार रूपयाची लाच घेणाऱ्या वनक्षेत्र सहायकाला भंडारा येथील विशेष न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षापुर्वी नाकाडोंगरी वनउपज नाक्यावर लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते.

ठळक मुद्देलाच भोवली : भंडारा न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सागवान फर्निचर जप्त प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वीस हजार रूपयाची लाच घेणाऱ्या वनक्षेत्र सहायकाला भंडारा येथील विशेष न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षापुर्वी नाकाडोंगरी वनउपज नाक्यावर लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते.सैय्यद शकील सैय्यद सलाम (५५) असे शिक्षा झालेल्या वनक्षेत्र सहायकाचे नाव आहे. तो तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनउपज तपासणी नाक्यावर कार्यरत होता. डोंगलसिंग जंगलुराम यादव रा. डोंगरी याच्या घरी धाड मारून सागवान फर्निचर जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यासाठी सैय्यद शलीलने वीस हजार रूपयांची लाच मागितली होती. २९ जानेवारी २०१५ रोजी वनउपज तपासणी नाक्यावर वीस हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले होते. त्यावरून गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी केला. मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी मंजुरी दिल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.भंडारा येथील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरकारी वकील प्रमोद भुजाडे यांनी यावेळी सरकारपक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने सदर गुन्ह्यातील साक्षीदारांची पडताळली केली. त्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने सैय्यद शकील याला एक वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधिक्षक महेश चाटे, तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, भाऊराव वाडीभस्मे, गणेश पदवाड, रविंद्र गभने, संदीप पडोळे यांनी सहकार्य केले.