शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एक हजार सौर कृषी पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:50 IST

वीज पुरवठ्याचा अभाव आणि भारनियमन यामुळे सिंचन करण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना : भारनियमनाच्या जाचातून मिळणार मुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वीज पुरवठ्याचा अभाव आणि भारनियमन यामुळे सिंचन करण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. तीन वर्षाच्या कालावधीत एक लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येणार असून भंडारा जिल्ह्यासाठी एक हजार सौर कृषी पंप मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साकोली येथे आयोजित आढावा बैठकीत दिली. यामुळे शेतकºयांना ओलिताचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.गत काही वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धान शेतीसह भाजीपाला पीक धोक्यात आले आहे. पाणी उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी सिंचन करणे शक्य होत नाही. डिझेल पंपाचा खर्च शेतकºयांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात गत काही वर्षात घट येवून कर्जाचा डोंगर वाढत आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत टप्प्याटप्प्याने एक लाख सौर कृषी पंप राज्यात स्थापित केले जाणार आहे. त्यातील एक हजार कृषी पंप भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहेत.गत सात वर्षात सात हजार ९४९ कृषी वीज जोडण्या देण्यात आल्या. उर्वरित जोडण्या मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कृषी पंपांना आठ तास वीज देण्यात येईल कारण जलसंधारण कायद्यानुसार पाणी उपस्याला मर्यादा घातली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध असतानाही विजेअभावी शेतकºयांना सिंचन करणे कठीण झाले आहे. यासाठी सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी लाभाची ठरणार आहे. ही योजना अनुसूचित जाती, जमाती, विशेष घटक योजना, आदिवासी उपाययोजनांतर्गत निधीचा वापर करून राबविण्यात येणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लवकरच जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार असून सदस्य सचिव महावितरणचे अधिक्षक अभियंता राहतील. तर सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त, वरिष्ठ वैज्ञानिक भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक यांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून उद्दीष्टाच्या मर्यादित अंतिम लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे.या योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्याकरिता सौर कृषी पंपाच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्याचा पाच टक्के हिस्सा राहील. ही योजना जिल्ह्यात तीन वर्षात टप्प्याटप्प्याने राबविली जाणार असून त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात निश्चितच वाढ होईल. त्यासोबतच शेतकºयांना रात्री बेरात्री सिंचनासाठी शेतात जाण्याची गरजही भासणार नाही. दिवसा सिंचन करणे या योजनेमुळे शक्य होईल.अखंडित व शाश्वत वीज पुरवठासर्व कृषी पंप ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी ६३ केव्हीए, १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात. त्या रोहित्रावरील लघुदाब वाहिणीद्वारे कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात येतो. लघुदाब वाहिणीची लांबी वाढल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होणे, विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होवून वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणात वाढ, वीज अपघात, वीज चोरी यामुळे अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. आता यावर उपाय म्हणून सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे.