शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार केंद्रांवर देणार ९५ हजार बालकांना ‘लस’

By admin | Updated: January 25, 2017 00:36 IST

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता पहिल्या टप्प्याची आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केलेली असून ...

पोलिओ लसीकरण मोहीम : २९ रोजी पाहिला टप्पाभंडारा :  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता पहिल्या टप्प्याची आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केलेली असून २९ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात १०२२ पोलिओ केंद्र तयार करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील नियमित लाभार्थी व विटभट्टया, ऊस तोडणी कामगार स्थलांतरीत वस्त्या, भटकी जमात, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणामधील जोखमीच्या भागातील लाभार्थी असे ९५ हजार ८३८ बालकांना या मोहिमेमध्ये लस देण्यात येणार आहे. ही मोहिम राबविण्याकरीता २ हजार ६३ कर्मचारी व अधिकारी विविध भागात कार्यरत राहणार आहेत. बुथवर काम आटोपल्यानंतर शहरी भागात ५ दिवस व ग्रामीण भागात ३ दिवस पी.पी.आय. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.जागतिक आरोग्य सघटनेने सन १९८८ मध्ये पोलीओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वषार्खाली सर्व बालकांना पोलीओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २१ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मुलनाकरीता आपण सर्वजन योगदान देत आहात, आपल्या अथक परिश्रमामुळे भारतामध्ये १३ जानेवारी नंतर आजतागायत एकही पोलिओ रूग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळेच भारताला पोलीओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मार्च २०१४ मध्ये मिळाले. पोलीओ निर्मुलनाची यशस्वीता बालकांना विहीत वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी व पल्स पोलिओ लसीकरण या ३ आधारस्तंभावर अवलंबून आहे. वरील तिनही कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे पोलीओ टाईप-२ जिवाणू १९९९ मध्ये पूर्ण पणे हद्दपार केले आहे. सन २०१० या वर्षात मालेगाव या शहरात ४ व बीड जिल्ह्यात १ असे ५ रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते. पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. पोलिओ निर्मूलन मोहीमेतील हे सर्वात महत्वाची कृती आहे. पल्स पोलिओ माहिमेचा पहिला टप्प्यामध्ये बालकांना लस देऊन १०० टक्के मोहीम यशस्वी करावी. एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपल्याकडे येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)