लाखनीत कार्यकर्ता मेळावा : नाना पटोले यांची ग्वाहीलाखनी : भंडारा गोंदिया जिल्ह्यात गरीब मजूर, शेतकरी, मच्छिमार, हमालकामे कणाऱ्या १ लाख लोकांचा स्वत: १२ रुपयाप्रमाणे विमा काढणार, अशी घोषणा खासदार नाना पटोले यांनी केली. लाखनी येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात भंडाऱ्यारचे आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, तारिक कुरैशी, शिवराम गिऱ्हेपुंजे, घनश्याम खेडीकर, पद्माकर बावनकर, डॉ.श्याम झिंगरे, बबलू निंबेकर उपस्थित होते. यावेळी खा.पटोले म्हणाले, लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुल, साकोली येथे उड्डाणपुल, सौंदड रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलास केंद्र सरकारतर्फे मंजूरी मिळविण्यात यश आल्याचे सांगितले. माझ्या पैशाने या लोकसभा क्षेत्रातील १ लाख लोकांचा विमा काढणार असून त्याची सुरुवात ५ जूनला माझ्या वाढदिवसापासून करणार आहे. शेतकरी संकटात असल्याने माझा वाढदिवस साधेपणाने साजरा करीत असल्याचे सांगितले. गरीब लोकांचा आपल्या पैशाने विमा काढून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करावा असे आवाहन खा.पटोले यांनी ा केले. जिल्हा परिषदेकडून घर जळालेल्या, नुकसानग्रस्तांना, आजाराने पिडीत लोकांना थेट १० हजारांची मदत देण्याचे काम हाती घेतले. वन जमिनीचे पट्टे गरीबांना देण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला असून जमिनीवरील नावे कमी करण्यास स्टँप पेपर व तहसील कार्यालयात नाममात्र खर्चावर आधारित योजना सुरु झाल्याची माहिती दिली. ब्रिटीशकालीन आणेवारी पद्धत बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ब्रिटीशकाळातील भूसंदनाचा कायदा रद्द करून भूमीअधिग्रहण बिल मोदी सरकारने शेतकरी हितासाठी व रोजगार उद्योगासाठी आणले. केंद्रीय मंत्री अनंत गीते हे भेल प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
एक लाख नागरिकांचा विमा काढणार
By admin | Updated: June 5, 2015 00:49 IST