शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

एक अभियंता निलंबित, दुसऱ्यावर शिस्तभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:29 IST

बेशिस्त वागणूक व कामात हलगर्जीपणाच्या मुद्यावरून महावितरणच्या दोन अभियंत्यापैकी एका अभियंत्याचे निलंबन, तर एका अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याशिवाय तीन तंत्रज्ञांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देतीन तंत्रज्ञ बडतर्फ : कामातील हलगर्जीपणा भोवला; महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेशिस्त वागणूक व कामात हलगर्जीपणाच्या मुद्यावरून महावितरणच्या दोन अभियंत्यापैकी एका अभियंत्याचे निलंबन, तर एका अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. याशिवाय तीन तंत्रज्ञांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी बुधवारी दिले.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अधीक्षक अभियंत्यांनी खोलापूर, वलगाव, अंजनगाव, पथ्रोट आणि दर्यापूर येथे आकस्मिक भेट देऊन प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून पथ्रोट व खोलापूर येथील ग्राहकांशी संवाद साधला. त्यांच्या वीज बिलांविषयक तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले. यावेळी पथ्रोट येथील सताड उघडे रोहित्र तसेच शेतात वाकलेल्या विद्युत पोलवर दुरुस्तीचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. महावितरणचा बहुतेक लाइन स्टाफ हा बाहेरगावी राहतो. संबंधित शाखा अभियंत्यांनी लक्ष देऊन नेमून दिलेल्या ठिकाणी न राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही यावेळी अधीक्षक अभियंत्यांनी निर्देश दिले. तीन तंत्रज्ञांवर बडतर्फीच्या कारवाईचे आदेश यावेळी त्यांनी दिले. यामध्ये दर्यापूर ग्रामीणचे दोन व खोलापूरचे एक अशा तिघांचा समावेश आहे. बेशिस्त वागणूक, ग्राहकांची दखल न घेणे, मद्यपान करून कार्यालयात येणे असे त्यांच्यावर आक्षेप आहेत. पथ्रोट येथील तत्कालीन सहायक अभियंत्यांनी सदोष मीटर बदलविताना ग्राहकांना झालेला त्रास व कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता कार्यालयात पाठविण्याचे तसेच खोलापूरच्या सहायक अभियंत्यावर बेशिस्त वागण्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देशही संबधित वरिष्ठ अधिकाºयांना खानंदे यांनी दिले.कामात सतत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी वीज कर्मचाºयांवर कारवार्इंचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. अशी वागणूक देणाऱ्यांची नावे ग्रामस्थ व महावितरणच्या इतर अधिकाऱ्यांनी कळवावीत.दिलीप खानंदे,अधीक्षक अभियंता अमरावतीया कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगाखोलापूरचे तत्कालीन सहायक अभियंता ठाकूर यांच्यावर शिस्तभंग, तर पथ्रोट येथील सहायक अभियंता इरपाते यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. दर्यापूर येथील तंत्रज्ञ रवि मारेकर, दीपक तायडे आणि खोलपूर येथील तंत्रज्ञ संजय तिरपुडे यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण