शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यांपासून बिबट पिंजऱ्यातच

By admin | Updated: December 27, 2014 01:05 IST

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी खांबा येथील महिलेला ठार केलेल्या बिबट्याला वनविभागाने दि.६ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले.

साकोली: नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी खांबा येथील महिलेला ठार केलेल्या बिबट्याला वनविभागाने दि.६ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. तेव्हापासून हा बिबट गडेगाव येथे पिंजऱ्यात आहे. मात्र त्याला कधी सोडण्यात येईल याची खात्री वनविभागालाही नाही. त्याच्यावर अनजुनही औषधोपचार सुरूच आहे, असे वनविभागातर्फे सांगण्यात येत आहे.ज्यावेळी हा बिबट पिंजऱ्यात पकडण्यात आला त्यावेळी या बिबट्याची तीन नखे गळून पडलेली होती. त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. नंतर पिंजऱ्यातच हा बिबट डोके आपटत असल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली. औषधोपचारानंतर बिबट्याच्या डोक्यावरची जखम दुरूस्त झाली असली तरी पायाची जखम अजूनही दुरूस्त झाली नाही. त्यामुळे त्याचेवर अजूनही औषधोपचार सुरू आहे, अशी माहिती वनविभागाने दिली. मृतकाचे कुटुंबीय मदतीपासून वंचितजांभळी येथील महिलेला ठार केल्यानंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी वनविभागातर्फे मृतक महिलेचा कुटूंबियांना पाच लक्ष रूपयाची मदत वनविभागातर्फे देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी वनविभागाकडून ही मदत अजुनपर्यंत मिळाली नाही. (तालुका प्रतिनिधी)