शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक, दोन रूपयांच्या नोटा चलनातून बाद!

By admin | Updated: June 19, 2015 01:03 IST

भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आणि दोनच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद केल्यामुळे लग्नसमारंभ धार्मिक कार्यात...

भंडारा : भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आणि दोनच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद केल्यामुळे लग्नसमारंभ धार्मिक कार्यात ११, २१ व ५१ रुपये देगणीच्या रूपात देणाऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे. काही वर्षापूर्वी एक व दोनच्या नोटांची नव्याने छपाई बंद करण्यात आली. तेव्हा नोटा जीर्ण होईपर्यंत त्या चलनात होत्या. हे रुपये बंद केल्याने आज कोट्यवधीचे चलन धूळखात पडले असून दैनंदिन व्यवहारामध्ये तुटवडा भासू लागला आहे. १, २ व ५ च्या नाण्याचा सुद्धा तुटवडा आहे. आज एक व दोनच्या कोऱ्या करकरीत नोटा देऊ केल्या तरीही कोणीही घ्यायला तयार नाही. सध्या एक दोन व पाचची नाणी व्यवहारात चालत असून या नाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. पाचची नोट चांगली असेल तर ती चालते. एक व दोनची नोटा का चालत नाही. एक व दोनची नाणी चालत असताना नोटा का चालत नाही असा प्रश्न नागरिकांना नेहमी पडतो. त्यामुळे याविषयी मते जाणून घेण्यासाठी टपरीधारक व लहान व्यवसायिकांशी चर्चा केली असता एक टपरीधारकाने सांगितले की, एक आणि दोनच्या नोटा व्यवहारात नसल्याने आमच्याकडून कुणी घेत नाही. त्यामुळे आम्ही या नोटा घेणे बंद केल्याचे त्याने सांगितले. एक आणि दोनच्या नोटाबरोबर पाच रूपयांच्या नोटांची कहाणी काही वेगळी नाही. कारणे काही जरी असली तरी एक-दोन आणि पाच रूपयांचा नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक जण असलेल्या नोटा एखाद्या समारंभात लिफाफ्यात देत असतात किंवा पर्समध्ये शोभेसाठी ठेवत असतात. (नगर प्रतिनिधी)