शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जुना कारधा पुलावरील वाहतुकीस प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 00:17 IST

लोकांच्या जिवितास हानी तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्ग ...

अधिसूचना जारी : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले निर्देशभंडारा : लोकांच्या जिवितास हानी तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेल्या जुन्या कारधा पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध घालणारी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी ८ आॅगस्ट रोजी जारी केली आहे. ही अधिसूचना तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेली आहे.रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर यांनी वैनगंगा नदीवरील जुना कारधा पुल हा १९२८ साली बांधण्यात आला असून सद्यस्थितीत पुलाचे स्तंभ हे पाण्याखाली असल्याने पुलाचे संपूर्ण निरीक्षण व स्थायत्य परिक्षण न झाल्याने सदर पुलावर दुर्घटना होवू शकते असे जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदर पुलावरून वाहतुकीस प्रतिबंध घालणारी अधिसूचना जारी केली आहे.जुना कारधा पुलास २००१ पासून मोठा नवा पर्यायी पुल कार्यान्वित आहे म्हणून जुन्या कारधा पुलाची दोन्ही बाजूची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. नागरिकांनी यापुढे जुन्या कारधा पुलाचा वापर न करता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी नवीन पुलाचा वापर करावा असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. ही अधिसूचना तात्काळ प्रभावाने अमलात आली आहे. (शहर प्रतिनिधी)