शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी वयोवृद्धाची भटकंती

By admin | Updated: January 13, 2015 22:55 IST

लोहार समाज जिल्ह्यात सर्वत्र विखुरला आहे. जीवनाचा गाढा चालविण्यासाठी हे समाज बांधव मिळेल त्या जागेवर दुकान मांडून पोटाची खडगी भरतो. शासनाने अशा गरजुंना घरकुल योजना

चिचाळ : लोहार समाज जिल्ह्यात सर्वत्र विखुरला आहे. जीवनाचा गाढा चालविण्यासाठी हे समाज बांधव मिळेल त्या जागेवर दुकान मांडून पोटाची खडगी भरतो. शासनाने अशा गरजुंना घरकुल योजना अस्तित्वात आणली आहे. मात्र, या योजनांचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे. लोहार समाजाचे अनेक कुटूंब उघड्यावर वास्तव्य करीत असल्याचे चित्र पवनी तालुक्यात बघायला मिळते. गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी लोहार समाज पवनी तालुका उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी केली आहे. शासनाने गरीबांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा म्हणून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जिवन जगणाऱ्यांना इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजना राबविल्या जातात. पंरतु या योजनेचा लाभ गरजूंना मिळाला नाही. तर याचा लाभ धनाढ्य लोकांना मिळत आहे. धनाढ्य लोक शासनाच्या योजनेचा फायदा घेऊन जवळचे लाखो रुपये खर्च करुन मोठमोठे बंगले बांधत आहेत. मात्र गरीब जनता या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागात पायपीट करीत आहे. पवनी तालुक्यातील भटक्या जमाती ‘ब’ लोहार समाजातील गोसे खुर्द येथील शालीकराम कृष्णा बागडे मागील चार वर्षापासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीच्या पायऱ्या झिजवत आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्यांचे नाव वरिष्ठांना पाठविल्याचे सांगुन मोकळे होता. मागील अतिवृष्टीत बागडे यांचे घर कोसळल्याने त्यांना राहण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. बागडे यांना राहण्याचे घर नसल्याने ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विनवणी करुन घरकुलाची मागणी केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शालिकराम बागडे व त्यांचे तिन भाऊ आसाराम बागडे, भगवान बागडे, दयाराम बागडे, गिरधर बागडे यांचे अतिवृष्टीत घर पडल्याने जागा अल्पशी व कुटूंब मोठे त्यांचे जगणे म्हणजे गाई, बैलाचा गोठा अशा जागेत वास्तव्य करित आहेत. सदर ग्रामपंचायतीमध्ये प्रतिक्षा यादीच लावण्यात न आल्याने आपला नंबर केव्हा लागणार हे लाभार्थ्यांना कळणार कसे? ग्रामपंचायतीने प्रतिक्षा यादी प्रकाशीत न केल्याने येथील गरजू लाभार्थ्यांना वगळून ज्यांना जास्त गुण आहेत व ते सरपंच, सदस्य यांचे जवळीक आहेत, अशांना त्यांचा लाभ दिला जात असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी तात्काळ प्रतिक्षा यादी फलकावर प्रकाशित करावी व गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावे, अशी मागणी लोहार समाज पवनी तालूका उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, शालीकराम बागडे यांनी केली आहे. (वार्ताहर)