शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून वृद्धाचा खून

By admin | Updated: July 21, 2015 00:34 IST

जागेच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धाला लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली.

अकोला (टोला) येथील घटना : परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल, लाकडी खांबाने मारहाणआंधळगाव : जागेच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धाला लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात आज (सोमवारी) मृत्यू झाला. हरिराम मारोती बाहे असे मृताचे नाव आहे. ही घटना काल रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील अकोला टोला येथे घडली. या प्रकरणात दोन्ही गटातील इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सूत्रानुसार, हरिराम मारोती बाहे व त्यांच्या बाजूला असलेल्या विजय बाहे यांचे घर आहे. हरिराम आणि विजय बाहे या दोन्ही कुटुंबांमध्ये जागेचा वाद आहे. शौचालयाकडे जाणाऱ्या मार्गावर जलाऊ काड्या का ठेवल्या या कारणाहून दोन्ही कुटुंबात वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यात हरिराम बाहे यांना घराच्या आड्यातील लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, गंभीररित्या जखमी झालेल्या हरिराम बाहे यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मच्छिंद्र बाहे यांच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी श्रावण सदाशिव बाहे, बंडू दौलत बाहे, विजय संपत बाहे व जीवन बाहे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ (३४) कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.या सर्वांना दि. २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच विजय बाहे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धरमदास बाहे, देवदास बाहे व कृष्णा बाहे व अन्य एका विरुद्ध भादंविच्या ३२४, ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला टोला येथे या घटनेची चर्चा होती. पुढील तपास आंधळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळबांधे करीत आहेत. (वार्ताहर)