शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

अधिकाऱ्यांनी जाणली ‘ग्रामस्वराज अभियाना’ंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:45 IST

जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देखुटसावरी गावाला भेट : योजना शाश्वत राहण्याकरिता प्रयत्न करा, दिल्लीतून आले अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली. त्यांनी पदाधिकाºयांशी चर्चा करून योजना शास्वत राहण्याकरिता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे ‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येत आहे.राबविलेल्या कामांची पाहणीकरिता खुटसावरी येथे गुरुवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास दिल्ली येथील सामाजिक न्यायचे अधिकारी डॉ. संजय सिंह यांनी भेट दिली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. य्ाावेळी सरपंच विजय वासनिक यांनी गावाची लोकसंख्या १,११० असून कुटूंब संख्या २८४ तर घराची संख्या आहे. १४ एप्रिलपासून आजपर्यंत ग्रामस्वराज अभियानांतर्गत आखून दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य दिले जात आहेत. या अभियानात अधिकारी व कर्मचारी हिरिरीने सहभाग घेवून गावात जनजागृती करीत असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. संजय सिंग यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या व्हिजीट बुकवर गावातील योजनांच्या कामाविषयी समाधानकारक असल्याचे नमूद केले. उपस्थित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना गावातील प्रत्येक नागरिकांना योजनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले.यावेळी विस्तार अधिकारी बडगे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. सरिता मालडोंगरे, एस. व्ही. ठमके, ए. एस. कानतोडे, आर. बी. मेश्राम, व्ही. व्ही. कांबळे, के. व्ही. तुमडाव, आशावर्कर सुजाता साखरे, ग्रा.पं. सदस्य प्रियंका टेंभुर्णे, छाया वाहने, शिपाई रुस्तम टेंभुर्णे, विनोद बोरकर आदी उपस्थित होते.