शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी दिला स्वच्छतेचा मंत्र

By admin | Updated: January 11, 2017 00:29 IST

चांदपूर धार्मिक स्थळाच्या पायथ्यालगतच्या ग्राम पंचायत मुरली हागणदारीमुक्तीच्या वाटेवर असून ...

शौचालयाचे निर्माण करण्याचा सल्ला : मुरली गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवरभंडारा : चांदपूर धार्मिक स्थळाच्या पायथ्यालगतच्या ग्राम पंचायत मुरली हागणदारीमुक्तीच्या वाटेवर असून अद्याप शौचालय बांधकाम न केलेल्या कुंटुबाकडे सहाय्यक गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी प्रत्यक्ष भेट देवून स्वच्छतेचा मंत्र दिला. तसेच शौचालयाचे निर्माण करून कुटूंब लयभारी करण्याचा सल्ला दिला. गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्लाने कुटूंबाच्या मदतीने घरी शौचालयाचे बांधकाम करून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सरपंच चेतना शरणागत माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तुमसर तालुक्यात स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी गट विकास अधिकारी गिरीष धायगुडे यांचे मार्गदर्शनात तर सहाय्यक गट विकास अधिकारी हिरुडकर यांचे नेतृत्वात सुरु आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावागावात जावून नागरिकांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपब्ध करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तुमसर तालुक्यातील चांदपूर धार्मिकस्थळालगतच्या मुरली येथील ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या टप्यात गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. १३० शौचालयाचे उदिष्ठ्य असून त्यापैकी १२८ शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. दोन शौचालयाचे बांधकाम उर्वरित आहे. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त करण्याच्या हेतूने सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी शनिवारला मुरली ग्राम पंचायतला भेट दिली व ग्राम पंचायत हागणदारी मुक्तीची स्थिती जाणून घेतली. यावेळी सरपंच चेतना शरणागत यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तीन कुटूंबांनी बांधकाम केले नसल्याचे सांगितले. दरम्यान सहा. गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष शौचालयाचे बांधकाम न केलेल्या राजेंद्र रहांगडाले यांचे घर गाठले व त्यांच्याकडे शौचालयाच्या स्थिती बाबत जाणून घेतले. यावेळी घरी उपस्थित शिक्षिकेचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या त्यांच्या मुलीकडून शौचालय बांधकाम न केल्याचे कारण जाणून घेतल्यानंतर कुटूंबातील प्रत्येकासाठी स्वच्छतेचा मंत्र दिला.स्वच्छतेचा मंत्र देताना, घरातल्या बालकाचे उदाहरण दिले. घरातला छोटा बालक घराच्या पुढे रस्त्यालगत शौचास जातो. शौचास करतेवेळी तो बालक हातात काडी घेवून मातीवर मनात आलेले विचार रेखाटत असतो. शौचविधी आटोपल्यावर आई बालकाला काळजी घेते मात्र हात स्वच्छ करायला विसरते. अस्वच्छ हाताच्या माध्यमातून बालकाला आजाराची लागण होते. पर्यायाने बालकाला दवाखाण्यात नेवून त्याच्यावर उपचार केले जातात. त्याच्या प्रकृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा प्रकार आपल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे निर्माण होत असतो.या उदाहरणातून कुटूंबातील छोटा असो व मोठा त्याला शौचालयाची गरज असतेच, असे सांगून स्वच्छतेशिवाय कुटूंब परिपूर्ण होवून शकत नाही हे पटवून दिले. सहा. गट विकास अधिकाऱ्यांनी छोट्या बालकाच्या उदाहरणातून शौचलायाचे महत्व, बांधकाम व वापर गरजेचे असल्याचे सांगून बांधकाम करण्याचा सल्ला दिला. आई वडिल घरी नसल्याने मुलीने कुटूंबात शौचालय बांधकाम करण्याचे सांगून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानंतर वृद्ध गजानन वाघमारे यांच्या घरी भेट देवून बांधकाम केलेल्या शौचालयाची पाहणी व वापर करण्यासाठी विनंती केली. तसेच शौचालयाचे बांधकाम न केलेल्या शिशुपाल मरस्कोल्हे यांचे घरी भेट दिली. यावेळी घरी असलेल्या महिलांसोबत संवाद साधून कुटूंबातील प्रत्येकासाठी शौचालयाचे बांधकाम करण्याची विनंती केली. या प्रसंगी उपस्थित महिलेने रविवार पासूनच शौचालय बांधकाम करण्याचा श्रीगणेशा करणार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी गावात येवून कुटूंबाच्या भेटी घेऊन शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरपंच शरणागत यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)