शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पीआरसी’च्या धसक्याने अधिकारी झाले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:27 IST

साहेब, कामासाठी आलोय, आज काम होईल काय? अशी आर्त विनंती करताना कार्यालयात येणारे करतात. पण, आज नाही तीन आॅगस्ट नंतरच बघू असे अधिकारी व कर्मचारी बोलताना दिसतात. आपली काम निट व्हावी यासाठी सगळ्यांची धावपळ होत आहे. ही धावपळ पीआरसी येत असल्याने होत असून सगळेच अधिकारी गतिमान झाल्याचे चित्र मोहाडी येथील विविध कार्यालयात बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देधावपळ सुरु : अधिक वेळ काम, फाईलिंग सुरु, मोहाडी तालुक्यातील अधिकारी तणावात
<p>राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : साहेब, कामासाठी आलोय, आज काम होईल काय? अशी आर्त विनंती करताना कार्यालयात येणारे करतात. पण, आज नाही तीन आॅगस्ट नंतरच बघू असे अधिकारी व कर्मचारी बोलताना दिसतात. आपली काम निट व्हावी यासाठी सगळ्यांची धावपळ होत आहे. ही धावपळ पीआरसी येत असल्याने होत असून सगळेच अधिकारी गतिमान झाल्याचे चित्र मोहाडी येथील विविध कार्यालयात बघायला मिळत आहे.विधानमंडळाची पंचायत राज समिती भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. एकवेळ रद्द झाल्याचा दौºयाचा मुहूर्त काढला गेला. १ आॅगस्ट ते ३ आॅगस्ट पर्यंत जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया पंचायत समिती व विविध प्राथमिक आरोग्य केंद्र ग्राम पंचायती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या भेटीचा कार्यक्रम २ आॅगस्ट रोजी ठरलेला आहे. त्यामुळे पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. आपल्या विभागाची माहिती अद्यावत करण्यात लागले आहेत. एवढेच नाही, फाईलिंग व्यवस्थित करणे, सध्या उपयोगाचे नसणारे रजिस्टर फाईल यांना कापडात बांधण्यात कार्य केला जात आहे. कार्यालयात असणारे कोळीष्टक काढली जात आहेत. साहित्याची ठेवण व्यवस्थित केली जात आहे. बाहेरचा परिक्षेत्र स्वच्छ होत आहे. वाढलेले गवत काढला जात आहे. एकुणच कार्यालयातील कामाची माहिती एकत्रित व अपडेट करणे व बाहेरचा स्वच्छता अभियान या सगळ्या कृतीने कार्यालयाच्या आतील व बाहेरील स्वच्छतेने कायापालट होत आहे. आपले सगळं व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी छोटेखानी बैठका घेतल्या जात आहेत. कार्यालयीन वेळापेक्षा कामासाठी अधिक वेळ दिला जात आहे. एका अधिकाºयांनी तर, आपण सगळे चौथ्या शनिवारी व सुटीच्या रविवार दिवशीही काम करू असे कर्मचाºयांना सांगितले. ही कामाची स्फूर्ती, गती आणली आहे. विधीमंडळाच्या पंचायती राज समितीने कार्यालयाची व नेमून दिलेली कामे, सभा, प्रशिक्षण, मेळावे ३ आॅगस्टच्या पुढे ढकलली गेली आहेत. प्राधान्य केवळ अन् केवळ पीआरसीला दिला जात आहे. पंचायती राज समितीमध्ये समितीप्रमुख आमदार सुधीर पारवे, आ. चरण वाघमारे, आ.अ‍ॅड.राहुल कुल, डॉ.सुधाकर भालेराव, भरतशेट गोगावले, राजेश क्षीरसागर, राहुल बोंद्रे, प्रा.विरेंद्र जगताप, राहुल मोटे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, श्रीकांत देशपांडे, बाबूराव पाचर्णे, रणधीर सावरकर, आर.टी. देशमुख, डॉ.सुरेश खोडे, सुधाकर कांबळे, किशोर पाटील, तुकाराम काते, भारत भालके, दिलीप सोपल, दीपक चव्हाण, डॉ.तानाजी सावंत, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील, दत्तात्रय सावंत या आमदारांचा समावेश आहे.