शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वहिवाट गणेशपुरात; मतदान भंडाऱ्यात

By admin | Updated: May 14, 2016 00:23 IST

गणेशपूर ग्रामपंचायतीची हद्द भंडारा नगरपालिका क्षेत्रातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका ईथपर्यंत विस्तारलेली आहे.

सीमावादात नागरिकांची फरफट : राज्य शासनाचा लाखोंचा महसूल बुडतोयनंदू परसावार / प्रशांत देसाई भंडारागणेशपूर ग्रामपंचायतीची हद्द भंडारा नगरपालिका क्षेत्रातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका ईथपर्यंत विस्तारलेली आहे. तलाठी कार्यालयाच्या नोंदीनुसार येथील नागरिकांची वहिवाट ही गणेशपुरात आहे. भंडारा व गणेशपूर या दोन गावांमध्ये सिमावादाच्या मुद्यावर राज्य शासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही. त्यामुळे शासकीय नोंदीनुसार वहिवाट गणेशपूर असली तरी येथील काही नागरिकांचे मतदान व करआकारणी भंडारा नगरपालिका करीत असल्याचा विचित्र प्रकार ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत भेटीत समोर आला. कुठल्याही गावाचे सीमांकन हे भूमिअभिलेख व तलाठी कार्यालयात असलेल्या नोंदी व नकाशावरून स्पष्ट होते. गावाच्या सीमांकनासाठी हे अभिलेख महसुल विभाग अधिकृत समजतात. भंडारा नगरपालिकेने कर वाढविण्याच्या हेतूने गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सीमेतील काही भागांना सामावून घेतले. वास्तविकतेत गणेशपूरच्या हद्दीतील ज्या वस्त्यांवर पालिका हक्क दाखवित आहे. ती वसाहत शासकीय दस्तऐवजानुसार आजही गणेशपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट असल्याची नोंद आहे.भंडारा नगरपालिकेच्या शहर विकास कार्यक्रम राबविणाऱ्या विभागाने त्यांच्या अखत्यारितील भूखंडासोबतच गणेशपूरच्या हद्दीतील वसाहतींनाही त्यांच्या हद्दीत येत असल्याची नोंद करून हा प्रकार घडवून आणला आहे. वास्तविक पाहता हा प्रकार अनागोंदी असल्याचे शासकीय दस्तावेजावरून दिसून आला आहे. यातील किचकट प्रकार असा की, या वसाहतीतील नागरिकांची वहिवाट ही शासकीय दफ्तरी नोंदीनुसार गणेशपूर असली तरी, त्यांचे मतदान प्रक्रियेतील नाव भंडारा नगरपालिका क्षेत्रात येत आहे. गणेशपूर ग्रामपंचायतीचे रहिवासी ऐवजी ते भंडारा शहराचे नागरिक म्हणून पालिकेच्या निवडणुकीत मतदान करतात. एवढेच नव्हे तर, हे सर्व नागरिक भंडारा पालिकेला नित्यनेमाने गृहकर भरतात. यातील काही कुटूंब तर गणेशपूर ग्रामपंचायत आणि भंडारा पालिकेलाही कर भरत नसल्याची बाब या भेटीदरम्यान समोर आली. सीमावादाच्या कचाट्यात गणेशपूर ग्रामपंचायतीचा वर्षाकाठी लाखोंचा कर बुडत आहे. गणेशपूर ग्रामपंचायतीची पालिकेतील सीमामिशन शाळेजवळ उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारापासून गणेशपूरची हद्द सुरू होते. वास्तविक पाहता ही सीमा याहीपुढे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद चौकापासून राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावीकडील भाग गणेश शाळेपर्यंत. राजीव गांधी चौकापासून तकीया वॉर्ड, औद्योगिक वसाहत, काही भाग भोजापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत. कपील नगर, पोलीस वसाहत ही सर्व गणेशपूर ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असल्याची नोंद तलाठी सातबारावर आहे.दाखल्यासाठी नागरिकांची पायपीटगणेशपूर ग्रामपंचायतीचे रहिवासी असतानाही अनेकांना भंडारा पालिकेने रहिवासी बनविले आहे. त्यामुळे अनेकांनी पालिका व ग्रामपंचायतीला कर भरलेला नाही. मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जेव्हा दाखल्याची गरज भासते. त्यावेळी पालक पालिका व ग्रामपंचायतीत धाव घेतात. नियमानुसार कर भरल्याखेरीज दाखला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड तपासला असता दोन्ही ठिकाणी नोंद आढळून येत नसल्यामुळे दाखल्यासाठी पालकांची फजिती होते.