शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चासाठी पीएफएमएस व डीएससी प्रणाली अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:25 IST

लाखांदूर : शासनाच्या १५ व्या वित्त आयोग अंतर्गत २०२०-२१ वर्षात लाखांदूर पंचायत समितीतील एकूण ६२ ग्रामपंचायतीसाठी ४ कोटी १६ ...

लाखांदूर : शासनाच्या १५ व्या वित्त आयोग अंतर्गत २०२०-२१ वर्षात लाखांदूर पंचायत समितीतील एकूण ६२ ग्रामपंचायतीसाठी ४ कोटी १६ लाख ८८ हजार ४१६ रुपयांचे अनुदान उपलब्ध केले आहे. यंदाच्या वर्षी ६२ ग्रामपंचायतींसाठी ३ कोटी ३१ लाख ६९ हजार ५५५ रुपयांची राशी उपलब्ध केली. दोन वित्तीय वर्षात मिळून तालुक्यातील एकूण ६२ ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत दरवर्षी दोन हप्त्या अंतर्गत तब्बल ७ कोटी ४८ लाख ५७ हजार ९७१ रुपयाचे अनुदान उपलब्ध केले गेले आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाद्वारा या अनुदान अंतर्गत विविध बंधित तथा अबंधित कामे करण्यासाठी शासन निर्देशानुसार पीएफएमएस व डीएससी प्रणाली विकसित न करण्यात आल्याने सदरील प्रणालीच अडसर ठरत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत दोन्ही वर्षाचे अनुदान राशी अखर्चित आहे.

शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीला प्राप्त अनुदान राशीमधून बंधित तथा अबंधित असे दोन प्रकारचे कामे करावयाची आहेत. अबंधित कामांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकाससह अन्य कामे केले जात आहेत. तर बंधित कामाअंतर्गत वीज , पाणीपुरवठा व स्वच्छता विषयक कामे केली जात आहेत.

शासनाच्या जिल्हा परिषदेद्वारा अनेक वर्षापासून ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा केला जात होता. मात्र वर्षभरापासून तालुक्यातील एकूण ६२ ग्रामपंचायती अंतर्गत पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील संपूर्ण ६२ ग्रामपंचायत अंतर्गत १०६.१३ लाख रुपयाचे वीजबिल थकीत आहे. तर शासनाच्या विविध पाणी पुरवठा योजने अंतर्गत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती अंतर्गत २२.९० लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या पथदिव्यांच्या वीजबिलाचा गत वर्षभरापासून भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील २३ गावांतील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या २३ गावाअंतर्गत २३.४७ लाख रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे. शासनाच्या विविध पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वर्षभरापासून पाणी कराचा भरणा न करण्यात आल्याने तालुक्यातील तब्बल १३ ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल खंडित करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्य शासनाद्वारा २३ जून रोजी शासनाच्या १५ व्या वित्त आयोग अंतर्गत पथदिवे तथा पाणी पुरवठा योजनेचे थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची अनुमती देण्यात आल्याने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार वीज कंपनी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईपासून नागरिकांना सूट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स

शासनाच्या अनुदानातून देयकाचा होणार भरणा

शासनाच्या जिल्हा परिषदद्वारा गत काही वर्षांपासून पथदिव्यांचे वीजबिल तथा स्थानिक ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी पाणीपुरवठा योजनेचे पाणी कराचा भरणा न करण्यात आल्याने वीजबिलाचा भरणा करण्यात आला नाही . सदर स्थितीत तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला गेल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच व अन्य पदाधिकारी संघटनांद्वारे शासनाला वीज बिलाचा भरणा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार ग्रामपंचायत प्रशासनाला केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदान राशीमधून पथदिवे व पाणी पुरवठा योजनेचे थकीत बिलाचा भरणा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.