शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण जागांवर ओबीसींना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले हाेते. आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून हाेत आहेत. त्यामुळे याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने आता हाेणाऱ्या सर्वसाधारण जागांवरील निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजातीलच उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला प्रयाेग भंडारा जिल्ह्यातही हाेत आहे. जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीत ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. केवळ महिला आरक्षणानंतर काय बदल हाेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे ६ डिसेंबर राेजी भंडारा जिल्हा परिषदेतील १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. उर्वरित सर्व जागांवरील निवडणूक हाेत आहे. निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य निवडणूक आयाेगाने स्थगित केलेल्या जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार कार्यक्रम घाेषित झाला. आता १८ जानेवारी राेजी मतदान हाेत आहे.सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले हाेते. आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून हाेत आहेत. त्यामुळे याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला काेणताही राजकीय पक्ष नाराज करण्याच्या तयारीत नाही. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. हा घटक निवडणुकीवर प्रभाव पाडू शकताे. त्यामुळे सर्वच पक्ष ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतरही सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र अशा परिस्थितीत ओबीसी संघटना निवडणुकीत काेणती भूमिका घेतात याकडेही सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

ओबीसी समाजाच्या भूमिकेकडे लक्ष- राजकीय आरक्षण गेल्याने संतप्त असलेला ओबीसी समाज या निवडणुकीत काय भूमिका घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही संघटनांनी आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमिका घेतली हाेती. मात्र, मतदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन राजकीय पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच ओबीसी समाजातून उमेदवारी देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे नाराज ओबीसी समाज काेणती भूमिका घेताे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर हाेत असलेल्या निवडणुकीत भाजप ओबीसी समाजातीलच व्यक्तींनाच उमेदवारी देणार आहे. ओबीसी समाजावर झालेला अन्याय या माध्यमातून दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.- सुनील मेंढे,खासदार

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल. शक्यताे ओबीसी समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल.- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

काॅंग्रेसचे आधीच ठरलेले उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून उभे राहतील. ओबीसी प्रवर्गासाठी काॅंग्रेसने उमेदवार निवडले हाेते. त्यांचा पुन्हा संधी दिली जाईल. ओबीसींवर हाेणारा अन्याय दूर करण्यासाठी काॅंग्रेस प्रयत्न करीत आहे. - माेहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस

 

टॅग्स :ElectionनिवडणूकOBCअन्य मागासवर्गीय जाती