लाखनी : स्थानिक समर्थ विद्यालयाचे शालेय पोषण आहार अफरातफर य्रकरणी जिल्हा परिषद व अधिक्षक यांची कारवाई करण्याची भूमिका संशयास्पद असून थातूरमातूर चौकशी व कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. १ जुलै २०१३ ते १ एप्रिल २०१४ पर्यंत उचल केलेल्या धान्याची मालाची चौकशी करून दोषी मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षक यांचेवर अफरातफरीचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जनतेच्या वतीने रिपब्लिक सेनेद्वारे करण्यात येत आहे.शालेय पोषण आहार अफरातफर प्रकरणाची चौकशीअंती मुख्याध्यापक कोल्हारे यांची वेतनवाढ थांबविण्याचे व १० हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले होते. परंतु ही कारवई प्रशासनाचे दिरंगाईमुळे प्रलंबित असल्याचे समझते. शालेय पोषण आहार धान्याची मालाची उचल दि. १ एप्रिल २०१४ रोजी करण्यात आली असून धान्यादी माल मिळाला नसल्याचा मुख्याध्यापकाचा शिक्का लावून सहाय्यक शिक्षकांच्या सह्यानिशी खोट्या पावत्या सादर केल्या म्हणून मुख्याध्यापक कोल्हारे व सहाय्यक शिक्षक महादेव चुटे हे सुद्धा तेवढेच दोषी असल्याची चर्चा आहे. शासन प्रशासनासोबत धोकाधडी करून भ्रष्टाचार करून राष्ट्रीय संपत्तीचा गैरवापर करून नुकसान केल्याचे स्पष्ट होत आहे. तेव्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा व अधीक्षक शालेय पोषण आहार यांचे मार्फत पोलिसात तक्रार करून दोषी गुन्हेगारांवर कठोेर कारवाई करण्याचे सौजन्य दाखविले जात नही. नाममात्र चौकशीअंती कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.सदर प्रकरणाची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. शालेय पोषण आहाराची उचल केलेली खरी पावती महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन लि. शाखा भंडारा यांचेकडून पावती मागविण्यात आली. त्यामध्ये पावती क्र. १०१५५ मध्ये धान्यादी माल अधिक उचल केल्याचे दर्शविले असून शाळा स्तरावर प्रत्यक्ष साठा, नोंद वहीतील साठा व पावतीवरील नोंदीत बरीच तफावत आहे. यावरून शालेय पोषण आहारात अनियमितता असल्याचे उघडकीस आले. तेव्हा त्या अगोदरच्या अनेक दिवसापासून धान्यादी मालाची अफरातफर केले जात असल्याचा संशय रिपब्लिकन सेनेने व्यक्त केला आहे. गरीब व सामान्य कुटुंबातील विद्याथ्योकरिता केंद्र शासनाने शालेय पोषण आहार या महत्वाकांक्षी योजनाद्वारे मुलांन शाळेतच दुपारचे भोजन मिळावे याकरिता अमलात आणली. त्यामधिल शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्याध्यापक जे.आर. कोल्हारे व खोट्या पावतीवर सह्या करणारे सहाय्यक शिक्षक महादेव चुटे यांना निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेद्वारे करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोषण आहाराची कारवाई संशयास्पद
By admin | Updated: November 23, 2014 23:13 IST