शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

कोरोना महामारीने नर्सरी, केजीचे चिमुकले यावर्षीही घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना महामारीने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. याचा परिणाम लहानांपासून ते वृध्दांपर्यंत पाहायला मिळत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना महामारीने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. याचा परिणाम लहानांपासून ते वृध्दांपर्यंत पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील प्री - प्रायमरी असलेल्या नर्सरी ते केजीचे चिमुकलेही यापासून सुटलेले नाहीत. नर्सरी व केजीमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील जवळपास २८ हजार विद्यार्थी यावर्षीही कोरोनामुळे घरातच राहणार काय, अशी चर्चा होत आहे.

आवडत्या सवंगड्यांसोबत आपल्याला पुन्हा खेळायला मिळणार की नाही, या भावनेने बच्चे कंपनीचाही हिरमोड होताना दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात नर्सरी ते केजीच्या जवळपास ७९ शाळा आहेत. या शाळांमधून २८ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नर्सरी ते केजी टू पर्यंतचे चिमुकले मागील वर्षी घरातच राहिले. यावर्षी कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे चिमुकले घरातच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी ते केजी शाळा चालविणाऱ्या अनेक संस्थाचालकांमध्ये चिंतायुक्त वातावरण पसरले आहे.

गत वर्षभरापासून शाळा कुलूप बंद आहेत. बच्चे कंपनी शाळेत येत नसल्यामुळे शालेय शुल्कसुद्धा मिळाले नाही. शाळेचे मेंटेनन्स, शिक्षकांचे वेतन याशिवाय अनेक बाबींवर पैसा खर्च होत असतो. शाळेची देखरेख पैशांभावी रखडली आहे. कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे

- सुरेश ठवकर,

शाळाचालक, कारधा (गिरोला)

मागील मार्च महिन्यापासून नर्सरी केजीची शाळा बंद आहे. चिमुकले शाळेत आले नाहीत. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहेत. मात्र, शाळा चालवायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होत आहे. आता तर कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे आम्ही अधिकच संभ्रमात सापडलो आहोत.

- राजेश गोंधुळे,

शाळाचालक, मोहाडी

सव्वा वर्षापासून कोरोना महामारीमुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थी शाळेत येत नाहीत. आमच्या डोळ्यासमोर फक्त अंधार दिसत आहे. शाळा चालवायची की बंद करायची? असाच प्रश्न आम्हाला उपस्थित होत आहे. किती दिवसापर्यंत असे चालणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. पालकही आम्हाला जाब विचारतात, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला देता येत नाही.

- किशोर कुंभारे, शाळाचालक, भंडारा

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी

दोन ते सहा वर्षे वयोगटातील मुले अनेकांचे अनुकरण करतात. शालेय शिक्षण बंद असल्याने त्यांच्या अनेक सवयीत बदल जाणवतात. अशावेळी पालकांनी त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. घरातच असल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो. अशावेळी पालकांनी त्यांच्यासोबत अधिक वेळ घालविण्याची गरज आहे. वयोमानानुसार त्यांच्या गरजांमध्ये थोडेफार बदल होत असतात, त्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. रत्नाकर बांडेबुचे,

मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा

वर्षभरापासून चिमुकले घरातच आहेत. त्यांच्या आवडीनिवडीकडे आम्ही लक्ष देतो. परंतु त्यांच्या शैक्षणिक सत्राबाबत थोडीशी चिंता वाटते. वयानं लहान असली तरी त्यांचा मूलभूत अभ्यासक्रम कच्चा राहू नये, याची आम्हाला काळजी वाटते.

- संजय माहुले, भंडारा

कोरोना महामारीमुळे विद्यार्थी घराबाहेर निघतच नाहीत. शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, त्यांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. त्यांच्या डोळ्यावर व आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- दिलीप गोन्नाडे, भंडारा

आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत आपल्या पाल्यांना शाळेत कसे जाऊ देणार, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या आरोग्याची काळजी हीच प्राथमिकता आहे, असे मला वाटते.

- अशोक रंगारी, भंडारा